ashadhi wari 2023 2 Dindi on their way to Pandharpur malegaon nashik news esakal
नाशिक

Ashadhi Wari 2023 : विठू नामाचा गजरात दोन दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ...

सकाळ वृत्तसेवा

Ashadhi Wari 2023 : रणरणते ऊन, पावसाने दिलेली ओढ आणि घामाच्या धारा वाहत असताना विठू नामाचा गजर करीत मालेगाव तालुक्यातील चार दशकांची परंपरा असलेली आघार खुर्द,

आघार बुद्रुक व चिंचावड या गावांच्या गिरणा नदीपात्रात त्रिवेणी संगमावर असलेल्या सिद्धेश्‍वर महादेवांची दिंडी व दाभाडी येथील दिंडी अशा दोन दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. (ashadhi wari 2023 2 Dindi on their way to Pandharpur malegaon nashik news)

दाभाडी येथील दिंडीलाही तीन दशकांची परंपरा आहे. या दोन दिंडींच्या माध्यमातून अडीचशेहून अधिक वारकऱ्यांनी पंढरपुरकडे प्रस्थान केले आहे. गावातून त्यांना भक्तिभावाने निरोप देण्यात आला. राज्यातील अवघ्या वारकरी संप्रदायाला विठूमाऊलीच्या भेटीची ओढ असते. वरुण राजा बरोबरच आषाढी एकादशीची वारकरी मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात.

‘भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी’ या गाण्याच्या उक्तीप्रमाणेच अवघे वारकरी विठू नामाच्या भक्तीत तल्लीन होऊन जातात. डोईवर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, टाळ व भगव्या पताका हातात घेत विठू नामाचा गजर करीत या दिंड्या मार्गस्थ झाल्या. वारकऱ्यांनी मुक्कामासाठी, खाण्यापिण्याचे साहित्य, बिछाना, छत्री, रेनकोट व अन्य वस्तूंसाठी समवेत गाड्या घेतलेल्या आहेत असे रामचंद्र हिरे यांनी सांगितले.

दिंडी दरम्यान एखाद्या वारकऱ्याला काही इजा व त्रास झाल्यास ही वाहने सहाय्यभूत ठरतात. त्यासाठी वाहनांची आवश्‍यकता भासते. मात्र विठू नामाचा गजर करीत रोजचे २५ ते ३० किलोमीटर अंतर केव्हा चालले जाते याचे भानही राहत नाही असे पायी दिंडीत प्रथमच सहभागी झालेले आघार खुर्दचे माजी सरपंच दौलत मोरे यांनी सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अशी आहे परंपरा

आघार बुद्रुक व खुर्द येथील दिंडीला तब्बल ४२ वर्षांची परंपरा आहे. पुरुषोत्तम महाराज यांच्या पुढाकाराने ही दिंडीची परंपरा सुरु झाली. नाना महाराज यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली दिंडी निघाली आहे. ८० पुरुष व ६० महिला दिंडीत सहभागी झाल्या आहेत. दाभाडी येथील दिंडी शिवाजी महाराज निकम यांच्या नेतृत्वाखाली निघाली आहे.

तीन दशकापासून ते दिंडी काढतात. दिंडीत सर्व व्यवस्था चोख असल्याचे सोमनाथ मानकर यांनी सांगितले. या दिंडीत दाभाडी व परिसरातील वारकरी सहभागी झाले आहेत. तालुक्यातून थेट गावापासून या दोनच दिंड्या पायी पंढरपूरला जातात.

"तालुक्यातून आघार बुद्रुक व दाभाडी या दोनच दिंड्या निघतात. अन्य शेकडो वारकरी हे एकत्रित वाहनाने आळंदीला जातात. येथून संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी बरोबर ८२ क्रमांकाच्या दिंडीत तालुक्यातील वारकरी आळंदी ते पंढरपूर असा पायी प्रवास करतात. या दिंडीचे नेतृत्व मुळचे देवघट येथील मात्र आळंदीत स्थायिक झालेले किरण महाराज पाटील हे करतात. याच दिंडीत तालुक्यातील भाविक वारीत सहभागी होतात." - नरेंद्र महाराज गुरव कीर्तनकार, मालेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction नंतरचे सर्व १० संघ; कोणाकडे सर्वात जास्त खेळाडू, तर कोणाकडे किती उरले पैसे; पाहा एका क्लिकवर

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: पृथ्वी, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

MLA Rohit Pawar : आपले उद्योग गुजरातला, तेथील ईव्हीएम महाराष्ट्रात

हैतीमध्ये अराजकता! टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू, अल्पवयीन मुलांची टोळ्यांमध्ये भरती

SCROLL FOR NEXT