Ringan esakal
नाशिक

Ashadhi Wari 2023 : 4 हजार सायकलिस्ट घालणार पंढरपुरात ‘रिंगण’! 2 दिवसांत ‘सायकल वारी’

सकाळ वृत्तसेवा

Ashadhi Wari 2023 : ‘सायकल चालवा, पर्यावरण वाचवा’ असा संदेश घेऊन राज्यातील सुमारे चार हजार सायकलिस्ट रविवारी (ता.११) पंढरपूरमध्ये पर्यावरण जागृतीसाठी दिंडी स्वरूप ‘रिंगण’ घालणार आहेत.

गावात प्रभात फेरीही निघणार असून सोमवारी (ता. १२) चंद्रभागा नदीची स्वच्छता करणार आहेत. या सोहळ्यासाठी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे सुमारे ४०० सायकलिस्ट शुक्रवारी (ता.९) सकाळी सहाला नाशिकहून पंढरपूरकडे प्रयाण करतील. (Ashadhi Wari 2023 4 thousand cyclists will make Ringan in Pandharpur Cycle Wari in 2 days nashik news)

‘नाशिक सायकलिस्ट’तर्फे दरवर्षी ‘सायकल वारी’ चे आयोजन केले जाते. यंदा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला असून दीडशे महिलांसह २५० युवक व पुरुष सायकलिस्ट सहभागी होत आहेत.

शुक्रवारी (ता. ९) सकाळी मुंबई नाक्याजवळील मनोहर गार्डन येथून सायकल वारीस प्रारंभ होईल. सायकलवारी सोबत ढोल-पथक, रथात आरूढ विठ्ठलाची २५ फूट मूर्ती असणार आहे. नाशिकरोडमार्गे सिन्नर, नांदूरशिंगोटे, नाणज मार्गावरुन ही वारी शनिवारी रात्री पंढरपुरात पोचेल.

राज्यातील जवळपास ४ हजार सायकलिस्ट या ठिकाणी जमणार आहेत. रविवारी पंढरपूर गावात पर्यावरण जागृतीसाठी प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. यात ‘सायकल चालवा, पर्यावरण वाचवा,’ ‘झाडे लावा, झाडे जगवा’, ‘पाणी आडवा, पाणी जिरवा,’ ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ असा संदेश देण्यात येईल.

प्रभात फेरीनंतर वारकऱ्यांप्रमाणे ‘रिंगण’ सोहळ्यातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात येणार आहे. सोमवारी दुपारी ३ ते ६ यावेळेत चंद्रभागा नदीच्या काठी स्वच्छता मोहीम राबवून हे सायकलिस्ट पुन्हा नाशिककडे प्रयाण करतील.

चारशे सायकलिस्ट सहभागी होणार असले तरी त्यांच्यासोबत स्वयंसेवक असणार आहेत. दुचाकी, चारचाकी वाहनांमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सायकल वारीत सहभागी होण्यासाठी संघटनेने नियमावली तयार केली असून त्याचे पालन करूनच प्रवेश दिला जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सायकलवारीचे नियम

-सहभागी सायकलिस्टचा विमा उतरवला जातो

-त्यांना हेल्मेट, ड्रेसकोड वापरणे बंधनकारक

-सायकल चालवताना मोबाईल वापरावर बंदी

-चालू सायकलवर व्हिडिओ किंवा फोटो काढण्यास बंदी

- प्रत्येक सायकल व सायकलिस्टला ट्रॅक वापरणे बंधनकारक

"सायकलप्रेमींचा उत्साह बघता यंदा १८ ते ८२ वयोगटातील व्यक्तींना ‘सायकल वारीत’ प्रवेश दिला आहे. सायकलिस्टच्या आरोग्याच्या दृष्टीने नियमांमध्ये काही प्रमाणात बदल केले आहेत. निसर्गाचा संदेश घेऊन आम्ही विठ्ठलाच्या चरणी लीन होत आहोत, याचा निश्चितच आनंद आहे."

-किशोर माने, अध्यक्ष, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: विधानसभा निवडणुकीत दुबईत आला पैसा, क्रिप्टोकरन्सीद्वारे बेकायदा फंडिंग; भाजपचा मविआवर खळबळजनक आरोप

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र नोंदवेल का ६५ टक्के मतदान? दहा वर्षांपासून ६० टक्केच नोंद

Women’s Asian Champions Trophy: भारतीय संघाची पाचव्यांदा फायनलमध्ये धडक; जपानला सेमीफायनलमध्ये केलं पराभूत

Hitendra Thakur: एका मताच्या जोरावर विलासराव देशमुखांचं सरकार तारणारे हितेंद्र ठाकूर; बदल्यात काय घेतलं होतं?

Anil Deshmukh : तुम्ही दगड मारा किंवा गोळ्या झाडा, अनिल देशमुख मरणार नाही, आणि तुम्हाला सोडणारही नाही

SCROLL FOR NEXT