हॉकी संघाचे माजी कर्णधार आणि मेजर ध्यानचंद यांचे पुत्र अशोककुमार ध्यानचंद  esakal
नाशिक

असुविधांमुळे विद्यार्थी खेळाडू होत नाही : अशोककुमार ध्यानचंद

नरेश हाळणोर

नाशिक : भारतीय हॉकीमध्ये एक सुवर्णकाळ होता. तोच काळ पुन्हा येऊ शकतो. फक्त राजकीय आणि क्रीडा क्षेत्राची प्रामाणिक इच्छाशक्ती हवी. शालेय स्तरापासूनच मुलांना खेळांप्रति आकर्षण निर्माण होईल असे वातावरण नाही, ही वस्तुस्थिती आहे. क्रीडा क्षेत्रांसाठीच्या असुविधांमुळे शालेय स्तरावरचा विद्यार्थी खेळाडू होत नसल्याची खंत भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार आणि मेजर ध्यानचंद यांचे पुत्र अशोककुमार ध्यानचंद यांनी व्यक्त केली.

हॉकीचे जादूगार म्हणून नावलौकिक असलेले मेजर ध्यानचंद यांचे पुत्र आणि भारतीय माजी कर्णधार ७४ वर्षीय अशोककुमार ध्यानचंद यांनी ‘सकाळ’ला मुलाखत देताना या भावना व्यक्त केल्या. भारतापेक्षाही आकाराने वा लोकसंख्येने लहान असलेल्या देशांनी ऑलिंपिक खेळात शेकडो पदके पटकावली. मात्र, त्यातुलनेत भारत खूप मागे आहे. यामागे राजकीय आणि क्रीडा क्षेत्राची असलेली उदासीनता, हे प्रमुख कारण असल्याचे अशोककुमार यांनी सांगितले. ते म्हणतात, शाळेत मुलगा आल्यानंतर त्याच्यात मैदानाचे आकर्षण निर्माण होईल, असे वातावरणच मिळत नाही.

ज्यांना कोणत्याही क्रीडा प्रकारात नावलौकिक प्राप्त करायचे असते त्यांना सरकारकडून सुविधा मिळत नाही. शासनाने यासाठी विशेष क्रीडा धोरण अमलात आणून त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल, अशा योजना आखल्या पाहिजे. क्रीडा विभागाच्याही व्यवस्थापनातही आमूलाग्र बदलाची गरज असून, गुणवान खेळाडूंना हेरून त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. असे होताना दिसत नाही. परिणामी, चांगले गुणवंत खेळाडू असामाजिक तत्त्वांमुळे नैराश्‍याच्या गर्तेत सापडून त्यांचे करिअर संपल्याची अनेक उदाहरणे असल्याचे श्री. अशोककुमार ध्यानचंद म्हणाले.

देशभरात किती शाळांमध्ये ॲस्ट्रो टफ हॉकीची मैदाने आहेत, असा प्रश्‍न उपस्थित करीत, सध्याच्या हॉकीबाबत श्री. अशोककुमार म्हणाले, की खासगी ॲकॅडमींमध्ये अशी मैदाने आहेत. परंतु त्याठिकाणी खेळाडूंच्या संख्येला मर्यादा पडते. शिवाय, तेथे सर्वसामान्य खेळाडू जाऊ शकत नाही. यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर ॲस्ट्रो-टफ हॉकीची मैदाने निर्माण झाली पाहिजे. तरच भारतीय हॉकीचा तो सुवर्णकाळ पुन्हा अनुभवता येऊ शकतो. केवळ पदके मिळवून आलेल्या खेळाडूंचा गौरव करून तसे होऊ शकणार नाही, असे स्पष्ट मतही श्री. अशोककुमार यांनी व्यक्त केले.

‘ती’ शाबासकी अविस्मरणीय

मेजर ध्यानचंद यांनी त्यांचा काळ गाजवला, नव्हे तो सुवर्णकाळच होता. अशोककुमार ध्यानचंद यांनी सुरवातीला फुटबॉल, क्रिकेट यांसारखे खेळ शाळेत खेळले. परंतु, वडील मेजर ध्यानचंद यांच्यापासून प्रेरणा घेऊन तेही हॉकीकडे वळले. सुरवातीला कोलकताच्या मोहन बगान संघाकडून खेळताना त्या वेळच्या दिग्गज खेळाडूंसमवेत खेळण्याची संधी अशोककुमार यांना मिळाली. त्यानंतर ते १९६९ मध्ये भारतीय संघात स्थान मिळाले. एशियाई आणि ऑलिंपिकमध्ये भारतीय संघाला रौप्य आणि कांस्यपदक मिळाली.

परंतु अशोककुमार हे वडील मेजर ध्यानचंद यांच्यासमोर ते पदक घेऊन गेले नाही. सुवर्णपदकांचे रतीब मिळविणाऱ्या खेळाडूंसमोर कोणत्या तोंडाने जाऊ, असे विचार त्यांच्या मनात यायचे आणि जायचे तर सुवर्णपदक घेऊनच, असा निश्‍चयच त्यांनी केला होता. ही संधी त्यांना १९७५च्या हॉकी वर्ल्ड कपमध्ये मिळाली.

स्पर्धेच्या अंतिम फेरीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरोधात हा सामना होता. पहिल्या हाफमध्ये १-१ अशी बरोबरी होती. दुसरा हाफ संपायला १४ मिनिटे शिल्लक असताना, गोलकिपरच्या समोर अशोककुमार ध्यानचंद यांना फ्लिकची संधी मिळाली आणि ती त्यांनी साधत गोल केला. भारत विजयी झाला. अशोक कुमार घरी आले आणि वडील मेजर ध्यानचंद यांच्यासमोर ते सुवर्णपदक दाखविले असता, त्यांनी पाठीवर मारलेली शाबासकी आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असल्याचे सांगतात अशो कुमार भावुक झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT