Department of Tribal Development esakal
नाशिक

Nashik News: गणवेशाआधी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार मोजे, बूट; प्रस्तावास मंजुरीची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा

Nashik News: आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी स्टेशनरी, मौजे व बूट खरेदीसाठीच्या ४३ कोटींच्या प्रस्तावाला आदिवासी विकास विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.

लवकरच निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. मात्र, उर्वरित गणवेश व इतर साहित्य खरेदीसाठीच्या प्रस्तावांना अद्याप प्रशासकीय मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना गणवेशासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र, गणवेशाआधी मौजे, बूट मिळणार आहे. (Ashram Schools of Tribal Development Department Students will get socks shoes before uniform nashik news)

राज्यात ४९९ शासकीय आश्रमशाळांमधून जवळपास दोन लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांसह वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना गणवेश, शालेय साहित्य, नाइट ड्रेस पुरवले जातात. या साहित्य खरेदीत भ्रष्टाचाराच्या तक्रारींमुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१६ मध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या थेट खात्यात रक्कम जमा (डीबीटी) करण्याचा निर्णय घेतला.

मात्र विद्यार्थी ठरवून दिलेल्या वस्तू घेत नसल्याने सुविधांपासून वंचित राहतात, अशा तक्रारी आदिवासी लोकप्रतिनिधींनी केल्याने सरकारने ३१ जुलैला ‘डीबीटी’ योजनेतून गणवेश संच, नाइट ड्रेस, शालेय साहित्य व लेखनसामग्री वगळण्याचा निर्णय घेतला.

सरकारने या साहित्य खरेदीसाठी प्रत्येक वर्गनिहाय खर्च निश्चित केला असून, या वर्षी ठरवल्यानुसार विद्यार्थ्यांना ‘डीबीटी’द्वारे प्रत्येकी चार हजार रुपये दिले जाणार असून, उर्वरित रक्कम साहित्य खरेदीसाठी वापरली जाणार आहे. राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हे साहित्य पुरवण्यासाठी एकाच वेळी २०२३-२४ व २०२४-२५ या दोन वर्षांसाठी मिळून १५० कोटींची खरेदी केली जाणार आहे.

आदिवासी विकास विभागाने या वस्तू खरेदीसाठीचे प्रस्ताव मंत्रालयस्तरावर पाठवले आहेत. त्यापैकी स्टेशनरी खरेदीच्या ३७ कोटींच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांना मोजे व बूट खरेदीच्या सहा कोटींच्या प्रस्तावालाही प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : 'परिवर्तन महाशक्ती'च्या आणखी २८ जागांची निश्चिती; स्वराज्य पक्ष, प्रहार पक्ष आजच आपल्या उमेदवारांच्या नावाची करणार घोषणा

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT