Aslam Maniyar, Madan Demse along with Vijay Karanjkar, Sudhakar Badgujar etc entered the presence of Uddhav Thackeray. esakal
नाशिक

Uddhav Thackeray Group : अस्लम मणियार, मदन डेमसेंचा ठाकरे गटात प्रवेश!

सकाळ वृत्तसेवा

इंदिरानगर/ नाशिक रोड : प्रभाग क्रमांक ३१ मधील पाथर्डी गाव येथील भाजपचे सक्रिय कार्यकर्ते मदन डेमसे, नाशिक रोडचे माजी नगरसेवक अस्लम मणियार, प्रशांत जाधव आणि योगेश भोर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी यांनी सोमवारी (ता. १६) मुंबई येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. (Aslam Maniyar Madan Demse join Uddhav Thackeray shivsena Group nashik news)

प्रभाग ३१ चे माजी नगरसेवक सुदाम डेमसे आणि संगीता जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मदन डेमसे यांचा ठाकरे गटातील प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. पाथर्डी सोसायटीचे माजी अध्यक्ष बाकेराव डेमसे यांचे ते चिरंजीव आहेत.

भाजपमधील माजी नगरसेवक सुदाम कोंबडे यांचा ठाकरे गटातील संभाव्य प्रवेशदेखील आजच्या प्रवेशामुळे थांबल्याचे जवळपास नक्की झाले आहे. शिवाय पाथर्डी गावातील ठाकरे गटाची ताकद वाढण्यास पुन्हा बळ मिळणार आहे.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

त्याचप्रमाणे देवळालीगाव येथील प्रशांत जाधव, शिवसेनेचे पुर्वीचे योगेश भोर यांनी प्रवेश केला. प्रवेश करताना युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचीदेखील भेट घेतली. युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख बाळकृष्ण शिरसाट आणि विभागप्रमुख त्र्यंबक कोंबडे यांच्यासह पाथर्डी गावातील असंख्य कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

जिल्हाप्रमुख विजय करंजकर, उपनेते सुनील बागूल, माजी आमदार वसंत गिते, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, दत्ता गायकवाड, विनायक पांडे, विलास शिंदे, केशव पोरजे, महिला आघाडीच्या शोभा मगर आदींसह नेते या वेळी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT