Asphalt melting esakal
नाशिक

Nashik: सिन्नरच्या रस्त्यावर डांबराचा चिखल! जुन्या नाशिक-पुणे महामार्गाच्या दुरुस्ती कामात ठेकेदाराची धूळफेक उघड

अजित देसाई

Nashik News : सिन्नर शहरातून जाणाऱ्या जुन्या नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गाचे दुरुस्तीचे काम काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाले. मात्र या रस्त्यावर संगमनेर नाका ते बस स्थानक दरम्यान पडलेले खड्डे बुजवण्यासाठी ठेकेदाराकडून डांबर फवारण्यात आले होते.

बुधवारी कडकडीत उन्हामुळे हे डांबर वितळून रस्ता निसरडा झाला व अनेक दुचाकी स्वार घसरून पडल्याच्या घटना घडल्या. (Asphalt on road of Sinnar contractors dust exposed in repair work of old Nashik Pune highway)

सिन्नर शहरातून जाणाऱ्या या मार्गाच्या दुरुस्तीसाठी खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय रस्ते निधीतून सुमारे 13 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता.

साडेआठ किलोमीटर लांबीच्या या रस्त्याचे काम पूर्ण झाले असले तरी कामाची गुणवत्ता खराब असल्याचे नागरिकांच्या तक्रारीतून वारंवार सांगण्यात आले. मात्र या दुरुस्ती कामाची देखरेख करणाऱ्या यंत्रणेकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

महिनाभरापासून संपूर्ण तालुक्यात पावसाने दडी मारली आहे. असे असताना पावसात काम केल्यामुळे काही ठिकाणी कामाची गुणवत्ता ढासळली असेल अशी पाठराखण अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.

बस स्थानक ते संगमनेर नाका दरम्यान दुरुस्ती कामानंतर देखीलर स्त्यावर काही प्रमाणात खड्डे पडले ते खड्डे बुजवण्यासाठी व गेल्या कामाची गुणवत्ता झाकण्यासाठी ठेकेदाराने डांबर फवारून रस्ता अधिक गुळगुळीत करण्याचा प्रयत्न केला.

मात्र ठेकेदाराची ही बनवेगिरी आणि धूळफेक बुधवारी पडलेल्या रखरखीत उन्हामुळे चव्हाट्यावर आली. उन्हामुळे डांबर वितळून अक्षरशः चिखल तयार झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यामुळे निसरड्या झालेल्या या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना अनेक दुचाकी स्वार घसरले. चार चाकी वाहने देखील स्लिप होऊ लागली. अतिशय हळुवारपणे मार्गक्रमण करत वाहनांची ये जा दुपारी चार वाजेपर्यंत सुरूच होती.

रस्त्याच्या दुरुस्ती कामावेळी ठेकेदाराने गुणवत्तेचे निकष पाळले नाही. त्यामुळे लवकरच रस्त्यात खड्डे पडले. त्यात डांबर फवारणी करण्यात आल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला.

या संपूर्ण दुरुस्ती कामाची चौकशी करावी व ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात आली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून या रस्त्याच्या दुरुस्ती कामावर देखरेख होती. वाहतुकीची वर्दळ आणि गॅस लाईनच्या कामामुळे दुरुस्ती कामात अडथळे आले होते.

बसस्थानक ते संगमनेर नाका दरम्यान विरघळलेल्या डांबरावर कच पसरवण्यात येईल त्यामुळे हे काम अधिक भक्कम होईल असे उप अभियंता वाय. ए. पाटील यांनी दैनिक सकाळची बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शिवसेना उबाठा गटाचे बाळा नर विजयी

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT