Nashik Sinnar News SYSTEM
नाशिक

Nashik News: सिन्नर औद्योगिक वसाहतीत डांबरीकरणाचे काम सुरु

सकाळ वृत्तसेवा

सातपूर (जि. नाशिक) : सिन्नरच्या माळेगाव औद्योगिक वसाहतीतील मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचा निर्णय घेण्यात आला असून, त्या ठिकाणी प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. यासंदर्भात निमातर्फे सलग तीन वर्षांपासून एमआयडीसीचे व स्थानिक अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात आला. (Asphalting work started in Sinnar Industrial Estate Nashik News)

या भागातील मुख्य रस्त्याच्या व अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरणासाठी जवळपास ९ कोटींचा निधी निमाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाला असून, प्रत्यक्षात कामास सुरवात झाली आहे. यामध्ये मुख्य रस्त्यासोबतच वसाहतीतील अंतर्गत रस्त्याचा समावेश आहे.

भविष्यात सिन्नर औद्योगिक क्षेत्राला अनन्य साधारण महत्व येणार असल्याने उद्योगांच्या विकासाच्या दृष्टीने अधिकाधिक कामे करण्याच्या दृष्टीने निमाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील, असे निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी या वेळी सांगितले.

सिन्नर औद्योगिक वसाहतीत १००० ते १२०० उद्योग आहेत, जवळपास १५ ते २० हजार उद्योजक, कर्मचारी व कामगार वर्ग या रस्त्यावरून प्रवास करतात. त्याचबरोबर अनेक मोठे कंटेनर्स व ट्रक्सची रहदारी असल्यामुळे मुख्य रस्त्याचे चांगल्या दर्जाचे काम होणे तितकेच महत्वाचे होते.

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

कामास सुरवात झाल्यामुळे सिन्नर औद्योगिक वसाहतीतील उद्योजक समाधान व्यक्त करत आहेत.

दरम्यान, ट्रक्स टर्मिनल, अंतर्गत ड्रेनेज सिस्टिम, मुख्य रस्त्याचे चौपदरीकरण व इतर पायभूत समस्यांबाबत लवकरच एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे निमाचे उपाध्यक्ष आशिष नहार यांनी या वेळी सांगितले.

सिन्नर उपसमितीचे अध्यक्ष संदीप भदाणे, माजी अतिरिक्त उपाध्यक्ष सुधीर बडगुजर, सिन्नर उपसामितीचे उपाध्यक्ष सुरेंद्र मिश्रा, निमा हाऊस उपसमितेचे अध्यक्ष राजेंद्र वडनेरे, एस. के. नायर, किरण वाजे, अरुण चव्हाणके, प्रवीण वाबळे, अजय बाहेती, राहुल नवले, अतुल अग्रवाल, दत्ता ढोबळे, बाबासाहेब हारदे, कृष्णा नाईकवाडी, रतन पडवळ, दत्तात्रय नवले, निलेश काकड, मुकेश देशमुख, शिवाजी आव्हाड, विश्‍वजीत निकम, उपअभियंता सुधीर चावरकर, सहायक अभियंता मळेकर आदी उद्योजक व अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT