MLA Dilip Bankar, Anil Kadam, Balasaheb Kshirsagar, Yatin Kadam esakal
नाशिक

Nashik Political News: राजकीय पटलावर विधानसभेची व्यूहरचना; निफाडमधून दिग्गजांची राजकीय मशागत सुरू

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : ग्रामपंचायत व सोसायट्यांच्या निवडणुकांनी निफाडच्या राजकारणात उडालेला धुरळा खाली बसत असला तरी अजून दीड वर्ष अवकाश असलेल्या विधानसभा निवडणुकीची निफाडच्या राजकीय पटलावर व्यूहरचना सुरू झाली आहे.

आमदार दिलीप बनकर, माजी आमदार अनिल कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम अशा गत वेळच्या तिघा दावेदारांबरोबरच आता मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांच्या नावाभोवती चर्चा रंगू लागली आहे.

आमदार बनकर यांचा राष्ट्रवादी वगळता उर्वरित तिघे कोणत्या पक्षाकडून उमेदवारी करणार हे अनिश्‍चित असले तरी राजकीय मशागत आतापासून सुरू झाली असल्याचे मतदारसंघात सुरू असलेल्या घडामोडींवरून दिसून येते. (Assembly strategy on political front Political cultivation of veterans continues from Niphad Nashik Political News)

एखादा नेता विजयानंतर हवेत गेला, की हवा गूल करून त्याला निफाडची जनता जमिनीवरही आणून सोडते हे २००९ व २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतून दिसून आले आहे. त्यामुळेच जनमाणसातील आमदार अशी प्रतिमा असलेल्या स्व. मालोजीराव मोगल यांच्यानंतर कुणालाही विधानसभा निवडणुकीची हॅटट्रिक साधता आली नाही.

विकासकामांसोबत जनतेचा आदर न केल्यास झटका बसतो याची जाणीव असलेले निफाडच्या आगामी विधानसभा निवडणुकीतील दावेदार आता जनतेला गृहीत धरण्याची चूक करताना दिसत नाही.

निफाड विधानसभा निवडणुकीतील प्रमुख दुरंगी लढत गत वेळपासून तिरंगी बनली आहे. यंदा यात मविप्रचे सभापती क्षीरसागर यांच्या संभाव्य उमेदवारीने चौथा रंग भरला गेला तर आश्‍चर्य वाटायला नको.

सद्यःस्थितीत सुरू असलेल्या गुप्त हालचालींतून तसे संकेत मिळत आहेत. त्यामुळे निफाडच्या बेभरवशाच्या राजकारणात थांगपत्ता न लागणारे डावपेच सुरू आहे. विधानसभा निवडणुकीसाठी किंगमेकर नेत्यांच्या फौज आपल्याकडे वळविण्याच्या हालचालीनां वेग आलेला आहे.

आमदार बनकर यांची उमेदवारी निश्‍चित आहे. सलग दोन पराभवानंतर गत निवडणुकीत दमदार कमबॅक करणारे आमदार दिलीप बनकर यांनी अनावश्‍यक बोलण्याच्या स्वभावाला मुरड घातली.

फटकळ बोलण्याने माणस तुटतात या चुकीची त्यांनी गत साडेतीन वर्षात पुनर्रावृत्ती केलेली नाही. संयम राखत जनमाणसांशी नाळ कायम राखण्याचा प्रयत्न केला. रासाका भाडेतत्त्वावर मिळवून त्यांनी खेळलेला मास्टरस्ट्रोक निफाडच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देऊन गेला.

विधानसभा निवडणूक अद्याप मुदतीप्रमाणे दीड वर्षावर आहे. पण लोकसभेसोबत म्हणजे चार महिने अगोदर होणार असल्याच्या चर्चेने निफाडचे नेते ॲक्शनमोडमध्ये आले आहेत. तत्पूर्वी पिंपळगाव बाजार समिती व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीकडे विधानसभा निवडणुकीचा ट्रेलर म्हणूनच पाहिले जाईल. त्यामुळे बनकरांची खरी कसोटी आहे.

काळानुसार रणनीती बदल

आमदार बनकर यांनी महाविकास आघाडी सरकारच्या सत्तेच्या माध्यमातून विकासकामे मंजुरीचा धडका लावला होता. आमदार बनकर यांच्या सुसाट सुटलेल्या गाडीला महाविकास आघाडीची सत्ता गेल्याने काहीसा विकासकामांना ब्रेक लागला आहे.

पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायत निवडणुकीत झालेला पराभव परिणाम करू शकतो. त्यामुळे उमेदवारी निश्‍चित असली तरी सध्याच्या राजकीय घडोमोडीतून त्यांनी वेळीच सावध व्हायला हवे.

कदम, कदम बढाते चले

माजी आमदार अनिल कदम यांनी गत तीन वर्षातील संघर्षाच्या काळात मतदारसंघात वावर कायम ठेवला. अभीष्टचिंतन सोहळ्यात दुरावलेले नेते, कार्यकर्ते कदम यांच्याबाबत सकारात्मक चर्चा

करताना दिसत होती. बेरजेचे राजकारण कदम यांनी सुरू केल्याचे वाढदिवसानिमित्त दिसले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते पुन्हा आक्रमक होताना दिसत आहे. पण सर्वाधिक अडथळा तो उमेदवारी करताना उद्धव ठाकरे हे पक्षांची उमेदवारी त्यांना देतील का हा आहे?

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

फक्त ओझरच नाही...

यतीन कदम यांनी मतदारसंघ पादाक्रांत करण्यास सुरवात केली आहे. पाडण्यासाठी नाही तर लढून जिंकण्यासाठी असा संदेश त्यांनी देण्यास सुरवात केली आहे. फक्त ओझरच्या मतांवर विधानसभेचा गड सर करता येणार नाही, याची जाणीव त्यांना झालेली आहे.

गोदाकाठचा प्रतिनिधी

गेली चार महिन्यापासून विधानसभा निवडणुकीच्या चर्चेत अनेक नवनवे व्टिस्ट आली आहेत. शिवसेनेकडून जिल्हा परिषद अध्यक्ष व आता मविप्रचे सभापतीपदी विराजमान झालेले शिवडीचे बाळासाहेब क्षीरसागर यांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याची उघड चर्चा आहे.

त्यांच्याही अभीष्टचिंतन सोहळ्यात डी. बी. मोगल यांनी सूचक विधान करून विधानसभेच्या तयारी लागण्याचा सल्ला दिला. क्षीरसागर यांनी तसा प्रयत्न सुरू केला आहे.

मतदारसंघातील मविप्रचे मतदार, नात्यागोत्याचे दाट पसरलेले जाळे व निफाड-गोदाकाठ परिसराला प्रतिनिधी असा प्रादेशिक मुद्दा क्षीरसागर समर्थक मांडत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

Islamic Country: 'या' मुस्लिम देशात भारतीय लोक खरेदी करत आहेत मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी; जाणून घ्या कारण

Medical Research : जगातले श्रीमंत लोक शोधतायेत अमर होण्याचे औषध, उंदरावर केलेला प्रयोग

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Astro Tips : नव्या जोडप्याची बेडरूम कोणत्या दिशेला असावी? दोघांमध्ये कलह होत असतील तर...

SCROLL FOR NEXT