सिन्नर (जि. नाशिक) : पतसंस्थेच्या थकीत कर्जदारांना 101 ची नोटीस बजावण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या सिन्नर येथील सहकार विभागाच्या सहाय्यक निबंधकास नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी दुपारी पंधरा हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
एकनाथ प्रताप पाटील असे लाचखोर सहाय्यक निबंधकाचे नाव आहे. या घटनेमुळे सिन्नर तालुक्याच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. (Assistant Registrar of Co operative Department caught while accepting bribe of 15 thousand Nashik Bribe Crime news)
तालुक्यातील एका पतसंस्थेकडून संस्थेच्या थकीत कर्जदारांना कर्ज वसुलीची नोटीस बजावण्यासाठी कलम 101 चे दाखले उपलब्ध करून देण्याच्या मोबदलात सहाय्यक निबंधक पाटील यांनी 17 प्रकरणांचे प्रत्येकी दीड हजार रुपये याप्रमाणे लाचेची मागणी केली होती.
या संदर्भात तक्रारदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाशी संपर्क साधल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. ठरलेल्या साडे पंचवीस हजार रुपये रकमेपैकी साडे पंधरा हजार रुपये रोख रक्कम पाटील यांनी स्वतःच्या कार्यालयात स्वीकारली.
या दरम्यान तेथे दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना लाचेच्या रकमेसह रंगेहात पकडून ताब्यात घेतले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे- वालावलकर, अप्पर अधीक्षक नारायण न्याहाळदे, वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील, पोलीस निरीक्षक संदीप साळुंके, सहायक फौजदार सुखदेव मुरकुटे, हवालदार पंकज पळशीकर, मनोज पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...
सिन्नर तालुका खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. आज या प्रक्रियेअंतर्गत अर्ज माघारीचा दिवस होता. श्री. पाटील हे या निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी आहेत.
त्यामुळे सकाळपासूनच सहाय्यक निबंध कार्यालयाच्या परिसरात निवडणूक अर्ज दाखल केलेल्या इच्छुक उमेदवारांची व त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी होती. या गर्दीतच श्री. पाटील यांनी लाचेची रक्कम स्वीकारली आणि ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले. या घटनेमुळे सिन्नर तालुक्याच्या सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.