At Kajwade in Katwan area tancker is finally started nashik news esakal
नाशिक

Nashik News : काटवन भागातील कजवाडेत अखेरीस टॅकर सुरू

दीपक खैरनार

Nashik News : मालेगाव तालुक्यातील कजवाडे व रामपुरा गटग्रामपंचायत असलेल्या गावाचे जलस्रोत आटल्याने गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासनाकडे टॅकरची मागणी जोर धरत होती. (At Kajwade in Katwan area tancker is finally started nashik news)

याबाबत तहसीलदार नितिनकुमार देवरेसह गटविकास आधिकारी भरत विंदे यांनी गावात भेट देऊन पाहणी केली होती. याच अनुषंगाने रविवार (ता.२३) पासून गावाला पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू झाल्याने नागरिकांची गैरसोय थांबण्यास मदत होणार आहे.

 काटवन परिसरातील कजवाडे व रामपुरा परिसरात जलस्रोत आटल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. ग्रामपंचायत प्रशासनाकडून टॅकरसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. स्थानिक नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत होती. गावाला पाणीपुरवठा करणा-या नळयोजनेही पाण्याअभावी माना टाकल्या होत्या.

ग्रामपंचायतीच्या सरपंच दिपाली सागर  भामरे, माजी सरपंच ज्ञानेश्वर कापडणीस, मच्छिंद्र ठाकरे, सागर भामरे, भिला कापडणीस, विजू कापडणीस, प्रसाद कापडणीस, नामदेव कापडणीस, पोपट भामरे, खुशाल कापडणीस यांनी तहसीलदार व गटविकास आधिकारी यांची भेट घेऊन गावाला भेडसावत असलेल्या पाणीटंचाई बाबत माहिती देत तातडीने दखल घेऊन गावासाठी टॅकर सुरू करण्यासाठी अवगत केले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

याबाबत तहसीलदार नितिनकुमार देवरे व गटविकास आधिकारी भरत विंदे यांनी गावाला भेट देऊन टंचाईग्रस्त भागाचा आढावा घेतला. कजवाडेत गेल्या पंधरा दिवसांपासून गावाला पाणी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थ अस्वस्थ झाले होते.

अखेरीस प्रशासनाने दखल घेऊन खाकुर्डी येथील विहिर अधिग्रहण करून गावाला रोज दोन फे-या टॅकरने केल्या जातील अशी माहिती देण्यात आली असून टँकरचे पाणी विहिरीत टाकून गावाला पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने दिली. रविवार (ता.२३) सकाळी गावात पाण्याचे टॅकर येताच गावकऱ्यांनी स्वागत केले व प्रशासनाचे आभार मानले.

"कजवाडे येथील नागरिकांसाठी पाण्याची सुविधा करणे आवश्यक होते मी व गटविकास आधिकारी यांनी तात्काळ पाहणी करून याबाबत व्यवस्था करून दिली जिल्हाधिकारी व प्रांतआधिकारी यांनीदेखील तात्काळ मान्यता दिली."-नितिनकुमार देवरे, तहसीलदार मालेगाव.

"गेल्या पंधरा दिवसांपासून गावात पाणी नसल्यामुळे गावातील नागरिकांचे प्रचंड हाल होत होते तहसीलदार व गटविकास आधिका-यांना वारंवार पाठपुरावा केल्यामुळे आज अखेर प्रतीक्षा संपली." -दिपाली सागर भामरे, सरपंच कजवाडे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: "भाजपचा नोट जिहाद सुरु"; विनोद तावडे प्रकरणावर ठाकरेंची कडवी प्रतिक्रिया

Virar : क्षितीज ठाकूर यांनी दाखविलेल्या डायऱ्यांमध्ये नेमके काय? नावांपुढे लिहिले...

Chandrakant Tingare: माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरेंवर हल्ला! पुण्यातील वडगावशेरीत घडली घटना

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'नंतर निर्मात्यांनी केली नव्या सिनेमाची घोषणा ! 'या' कलाकारांच्या मुख्य भूमिका

Latest Marathi News Updates : रायरेश्वर मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी मतदान कर्मचाऱ्यांचा पायी प्रवास

SCROLL FOR NEXT