atiq ahmed and brother ashraf ahmed killed in prayagraj asad ahmed encounter guddu muslim nashik connection esakal
नाशिक

Atiq Ahmed Killed : तो गुड्डू मुस्लिम नव्हेच! नाशिकमध्ये STF ने ताब्यात घेतलं तो नेमका कोण? जाणून घ्या सविस्तर

सकाळ वृत्तसेवा

Atiq Ahmed Killed :उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे शनिवारी (ता. १५) सायंकाळी (Nashik News) माफिया आणि बाहुबली अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. (atiq ahmed and brother ashraf ahmed killed in prayagraj asad ahmed encounter guddu muslim nashik connection suspect arrest crime news)

पोलीस बंदोबस्तात असताना अतिक अहमद आणि त्याच्या भावाची फिल्मी स्टाईलमध्ये हत्या करण्यात आली. दोन्ही भावांच्या एकाच वेळी झालेल्या हत्येने संपूर्ण उत्तर प्रदेश हादरले आहे. अहमद भावांच्या हत्येनंतर दिल्ली पोलिसांच्या STF (स्पेशल टास्क फोर्स) पथकाने नाशिक मध्ये येत चौकशीसाठी एका संशय त्याला ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेला संशयित गुड्डू मुस्लिम आहे की त्याचा साथी यावर माध्यमांमध्ये जोरदार चर्चा झाली. मात्र यातून एक वेगळं तथ्य समोर आलं आहे. काल रात्री नाशिकमध्ये अतिक अहमद खून प्रकरणात नेमकं काय घडलं, दिल्लीहून आलेल्या पोलिसांच्या पथकाने कोणाला ताब्यात घेऊन चौकशी केली याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

दरम्यान प्रकरणात अतिक अहमदचा साथी गुड्डू मुस्लिम हा नाशिकमध्ये असल्याच्या संशय व्यक्त केला जात होता. त्यामुळे या हत्येचं नाशिक कनेक्शन समोर येऊ पाहत होत. याच प्रकरणी पुढील तपासासाठी दिल्ली पोलिसांचे STF (स्पेशल टास्क फोर्स) पथक शनिवारी (ता. १५) नाशिक मध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

त्या व्यक्तीचे नाव शिवबाबा दिवाकर. पोलिसांच्या चौकशीमध्ये नेमकं काय घडलं, पोलिसांनी दिवाकर यांना का ताब्यात घेतलं याविषयी सविस्तर माहिती त्यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितली.

शिव दिवाकर नाशिक मधील अंबड एमआयडीसी परिसरात एका हॉटेलमध्ये कामाला आहे. दिवाकर सांगतात त्यांच्या मोबाईलवर एक अज्ञात कॉल आला, कॉल उचलतात समोरील व्यक्तीने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व पुन्हा या नंबर वर फोन न करण्याची धमकी देखील दिली.

हा फोन झाल्याच्या काही तासात दिल्लीहून पोलिसांचे STF पथक नाशिकमध्ये दाखल झाले व दिवाकर ज्या हॉटेलमध्ये काम करतात तेथे पोहोचले. यावेळी हॉटेल चालकाने स्थानिक पोलिसांना देखील याविषयी माहिती दिली. STF पथकाने दिवाकर यांना चौकशीसाठी अंबड पोलीस स्टेशन येथे आणले.

त्यांना आलेला फोन कुठून कोणाचा होता, त्यांचा या घटनेशी काही संबंध आहे का याविषयी सखोल विचारणा करून तब्बल दोन ते तीन तासांच्या चौकशीनंतर दिवाकर यांना पुन्हा त्यांच्या हॉटेलवर सोडून देण्यात आले. यानंतर दिल्ली STF पथक मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा दिल्लीच्या दिशेने रवाना झाले.

"काल दिल्ली पोलिसांचे STF पथक नाशिकमध्ये येऊन चौकशी करून गेले. ते आर्म ॲक्टच्या चौकशीसाठी नाशिकमध्ये आले होते. जाताना त्यांनी गुड्डू मुस्लिम किंवा अन्य कोणालाही सोबत नेले नाहीये." - सूरज बिजली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबड पोलीस स्टेशन

त्यांच्या या चौकशीतून नेमकं काय निष्पन्न झालं. आणि यातून आतीक अहमद प्रकरणाचे धागेदोरे नाशिक मध्ये मिळणार का हे पाहणे महत्वपूर्ण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT