grapes farming esakal
नाशिक

Nashik Grapes News: द्राक्षबागांवर रसशोषक किड्यांचा हल्ला; शेतकरी हवालदिल

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : निफाड तालुक्यातील द्राक्षबागांवर रसशोषक किड्यांनी (थ्रिप्स) हल्ला चढविला आहे. हे किडे द्राक्ष पानांच्या शिरांचा दंश करून पानातील अन्नरस शोषून घेत असल्याने द्राक्षबाग बहरण्यात अडथळा येतो.

पानाचा आकार वाटीसारखा होत आहे. फुलोरा अवस्थेत पुढच्या टप्प्यात असलेल्या बागांमधील द्राक्ष मण्यांना चावा घेऊन जखमा करतात. (Attack of sap sucking insects on vineyards nashik news)

द्राक्ष घडांचा दर्जा ढासळत आहे. थ्रिप्स किड्यांच्या नियंत्रणासाठी चिकट सापळा लावले, औषध फवारणी केली तरी किडीचा प्रादुर्भाव रोखणे अशक्य होते. अवकाळी व गारपिटीचे संकट झेलल्यावर आता रसशोषक किडीच्या नव्या संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे.

अवकाळी पाऊस द्राक्षबागांचे अतोनात नुकसान करून गेला. त्याचे परिणाम अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना सोसावे लागत आहेत. पावसामुळे बागेत तण वाढले. त्यात असलेले रसशोषक किडे द्राक्ष घड व पानावर चढाई करीत आहेत.

हिरव्या रंगाची कीड रात्री पानातील शिरांमधून अन्नरस शोषून घेते. त्यामुळे पानातील अन्नरस कमी होऊ पानाची जागा गोल आकाराची होऊन शेंड्यांची वाढ खुंटत आहे. मणी अवस्थेतील द्राक्ष घडांना किड्यांच्या आक्रमणाने जखमा होतात. त्यातून काळे डाग पडत असून, द्राक्ष घडांचा दर्जा खालावत आहे.

रसशोषक किडे रात्री द्राक्ष पानांवर हल्ला करतात. त्यांना पकडण्यासाठी द्राक्ष बागेत चिकट द्रावणाचा पिवळा कागदाचा सापळा लावला जात आहे. त्यामुळे कीटक त्याला चिटकून बसतात. थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना हा सर्वाधिक प्रभावी उपाय वाटत आहे.

याशिवाय, कीटकनाशकांची फवारणी केली जाते. चिकट कागद किंवा औषध फवारणी करून थ्रिप्स नियंत्रणासाठी एकरी पाच ते दहा हजार रुपये खर्च वाढला आहे. निफाड तालुक्यातील सुमारे ३० हजार एकर द्राक्षबागांमध्ये रसशोषक किडींचा प्रादुर्भाव जाणवतो.

"अवकाळी पावसामुळे द्राक्षबागांमध्ये घडकुज, भुरीचे संकट ओढवले आहे. त्यात रसशोषक किडींनी कहर केला असल्याने द्राक्ष उत्पादकांसाठी दुष्काळात तेराव महिना ठरतो." - साहेबराव देशमाने, द्राक्ष उत्पादक, पिंपळगाव बसवंत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: याला म्हणतात नियती! ज्यांना पवारांनी घरी बसवलं, त्यांनाच आता विधानसभेत पाठवणार...

Peacock: आश्चर्य! मोराच्या वर्तनात कमालीचे बदल, साडेसहा हजार फुटांवर घेतली भरारी; अभ्यासकांनी व्यक्त केली 'ही' भीती

IND vs PAK: सामना जिंकला, मात्र एक चूक अन् ICCकडून शिक्षा, टीम इंडियाच्या खेळाडूनं नेमकं काय केलं?

Raj Thackeray : विधानसभा जिंकण्यासाठी तयार रहा! राज ठाकरेंनी घेतला पश्‍चिम महाराष्ट्राचा आढावा

Latest Maharashtra Live News Updates : मुख्य सचिव आणि डीजीपी यांना राजभवनात बोलावले

SCROLL FOR NEXT