attempt to suicide esakal
नाशिक

मालेगाव येथे ध्वजारोहण सोहळ्यात आत्मदहनाचा प्रयत्न

प्रमोद सावंत

मालेगाव : शहरातील पोलिस कवायत मैदानावरील मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात छायाचित्रण, सीसीटीव्ही सेवा पुरवठादार ठेकेदाराने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली.

कोरोना संसर्गकाळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी वेगवेगळ्या सुविधा, वाहने तसेच पोलिसांना भोजन पुरविणाऱ्या ठेकेदारास दोन वर्षाचा कालावधी उलटूनही ९३ लाख ९५ हजार ५४७ रुपयांचे थकीत बिल वारंवार मागणी करूनही मिळाले नाही. यामुळे संतप्त झालेल्या ठेकेदाराने आज ध्वजारोहण प्रसंगी अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या सेवा पुरवठादार ठेकेदारांनी कामाची बीले न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा दिला होता. आज सकाळी राजू मोरे यांनी आत्मदहनाचा अयशस्वी प्रयत्न केला. हा प्रकार जवळच उभ्या असलेल्या नागरिकांच्या लक्षात आला. त्यांनी आरडाओरड करताच पोलिसांनी धाव घेत आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या ठेकेदाराला रोखले. यामुळे येथे गोंधळ उडाला.

कोरोनासंसर्गात बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांच्या भोजनासह शहरात अंतर्गत वहातुक, वाहने, मंडप, लाईट ,ध्वनीक्षेपक, पाणी, सीसीटीव्ही अशा विविध सुविधा पुरविण्याचा ठेका राजू मोरे व अन्य पुरवठादार यांना देण्यात आला होता. या सुविधांसाठी मोरे यांनी 93 लाख 95 हजार 547 रुपयांचे बिल जमा केले होते. वाहनधारकांचे सुमारे १३ लाखांचे बील थकीत आहे. दोन वर्ष उलटूनही बील मिळत नसल्याने सर्व पुरवठादार आर्थिक विवंचनेत असून त्रस्त झाले आहेत. त्यातून हे पाऊल उचलले असे श्री. मोरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Latest Maharashtra News Updates : ७५ पेक्षा जास्त सभा घेतल्या, सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मांडत गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्रचाराचा लेखाजोखा

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

SCROLL FOR NEXT