Lasalgaon Market Committee esakal
नाशिक

Nashik Onion Auction: लासलगावला कांद्याला 2050 रुपये सरासरी भाव! बाजार समितीत कांदा लिलाव सुरू

सकाळ वृत्तसेवा

लासलगाव : येथील बाजार समितीत कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र, १३ दिवसांनंतर कांद्याला सरासरी २०५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाले.

चाळीततील कांदा सडल्याने कांद्याला तीन ते चार हजार रुपयांचा दर मिळणे अपेक्षित होते, असा सूर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला व मिळणाऱ्या दराबाबत नाराजी व्यक्त केली. (Average price of Lasalgaon onion 2050 rupees Onion auction starts in market committee nashik)

येथील बाजार समितीत १८४ वाहनांतून कांद्याची १२ हजार ५०० क्विंटल आवक झाली. त्याला जास्तीत जास्त २,५४१ रुपये, कमीत कमी ८०० रुपये, तर सरासरी २०५० रुपये प्रतिक्विंटलला दर मिळाला.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा प्रतवारी करून आणल्यास कांद्याला योग्य दर मिळतील, असे बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी शेतकऱ्यांना सांगितले.

मागण्यासाठी कांदा व्यापाऱ्यांनी २० सप्टेंबरपासून कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेत बेमुदत संप पुकारला होता. गेल्या १३ दिवसांपासून कांद्याचे लिलाव बंद होते. यामुळे शेतकऱ्यांचा कांदा चाळीत मोठ्या प्रमाणात सडला.

शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शासनाला या मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी एक महिन्यांची मुदत देत आम्ही कांदा लिलावात सहभागी होत असल्याचे लासलगाव बाजार समितीचे व्यापारी संचालक प्रवीण कदम यांनी सांगितले.

"सततचे ढगाळ हवामान आणि आता परतीच्या पावसाने चाळीत साठवून ठेवलेला कांदा बाजार समित्या बंद असल्याने मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. उत्पादन खर्च वाढल्याने किमान तीन ते चार हजार रुपये प्रतिक्विंटलला दर मिळणे अपेक्षित होते. १४ दिवसांपूर्वी असलेले दर मिळत असल्याने आज आम्ही तोट्यात कांदा विक्री करीत असून, शासनाने कांद्याला पाचशे ते हजार रुपये लाल कांद्याप्रमाणे अनुदान द्यावे."-धनंजय कांदळकर, कांदा उत्पादक शेतकरी

"कांदा निर्यातीवरील ४० टक्के शुल्क रद्द करावे, नाफेड व एनसीसीएफमार्फत कांद्याची खरेदी करत मार्केट आवारावर थेट विक्री करू नये, या शेतकरी हिताच्या मागण्यासाठी कांदा व्यापाऱ्यांनी बंद पुकारला होता. मात्र, शासनाने फक्त शहरी भागातील नागरिकांचा विचार केला. आम्ही काय पाकिस्तानातील शेतकरी आहेत का? शेतकऱ्यांचा विचार का शासन करत नाही. ज्या दिवशी शेतकरी विचार करेल, त्यादिवशी सत्तेतील राज्यकर्त्यांना राज्यात फिरणे मुश्किल होईल."- किशोर कुटे, कांदा उत्पादक शेतकरी, वेळापूर (ता. निफाड)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Test: भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ४-० असं जिंकूच शकत नाही...! सुनील गावस्करांनी दिला मोलाचा सल्ला

Dharashiv Vidhan sabha election : धाराशिवमधल्या चारही मतदारसंघांमध्ये बंडखोरी टाळण्यात महायुती अन् महाविकास आघाडीला यश; लढत स्पष्ट

Hingoli Assembly : हिंगोली जिल्ह्यात कसं आहे राजकीय गणित? कुणाविरुद्ध कोण लढणार?

"म्हणूनच मराठी अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये कामवाली बाईचं काम दिलं जातं" ; तृप्ती खामकरने सांगितलं कटू सत्य

Zip and go sadi : झिप अँड गो साडी; नवीन फॅशन ट्रेंड जो आपला लूक बनवतो स्टायलिश

SCROLL FOR NEXT