Shree M & Dr. Rajendrasingh esakal
नाशिक

अविरल गोदावरी : स्वच्छ गोदावरी... प्लास्टिकमुक्त ब्रह्मगिरी

सकाळ वृत्तसेवा

लेखक : चिन्मय उदगीरकर

एखाद्या शहरातील पर्यावरण कसे आहे, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. स्वच्छ हवा, नितळ पाणी, हिरवीगार वनराई, डोंगर असतील तर शहरातील पर्यटन चांगले असते, दळणवळण चांगले होते आणि पर्यायाने शहराचा विकास होतो.

निसर्गाची सेवा हीच मानवाची सेवा असे मानणाऱ्या समाजसेवींच्या एकत्रीकरणातून निर्माण झालेल्या ‘अविरल गोदावरी’ अंतर्गत नाशिक व त्र्यंबकेश्वरक्षेत्री पर्यावरणीय चळवळीने आकार घेतला आहे. त्याचा पुढचा टप्पा म्हणून कामांचा प्रारंभ येथे २ व ३ ऑक्टोबरला होत आहे, त्यानिमित्त... (Aviral Godavari Clean Godavari plastic free Brahmagiri article by chinmay udgirkar nashik)

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आध्यात्मिक व क्रियायोगाचे गुरू तसेच पाणी चळवळीचे प्रणेते श्री एम आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ, रेमन मॅगसेसे पुरस्कार विजेते, पाणीवाले बाबा म्हणून संपूर्ण भारतवर्षात प्रसिद्ध असलेले डॉ. राजेंद्रसिंह यांचा मिलाफ एखाद्या चळवळीत झाला तर हा मणिकांचन योग म्हणावा लागेल.

ती चळवळ नक्कीच देशव्यापी रूप धारण करून आपला एक मानदंड जगासमोर ठेवेल, यात शंका नाही. या दोन्ही महानुभावांनी नाशिकची गोदावरी व त्र्यंबकेश्वरचा ब्रह्मगिरी याप्रश्नी लक्ष घातले असून, स्वच्छ गोदावरी व प्लास्टिकमुक्त ब्रह्मगिरीची हाक नाशिककरांना दिली आहे.

‘अविरल गोदावरी’ उपक्रमाच्या अंतर्गत २ आणि ३ ऑक्टोबरला होणारा हा कार्यक्रम म्हणजे भविष्यातील पर्यावरणीय बदलाची नांदी आहे.

श्री एम हे आध्यात्मिक गुरू, समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ असून, त्यांचा जन्म केरळमधील थिरूवनंतपूरमध्ये झाला. एक तरुण मुलगा ते वास्तविक योगी हा त्यांचा प्रवास अत्यंत परिवर्तनशील होता.

त्यांनी वयाच्या १९ व्या वर्षी हिमालयातून प्रवास केला, अनेक साधू-संतांचा सहवास अनुभवला. शेवटी महेश्वरनाथ बाबाजी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आध्यात्मिक पूर्णत्व प्राप्त केले. त्यांनी लिहिलेले ‘अप्रेनटीसेड टू हिमालयीन मास्टर- अ योगीज ऑटोबायोग्राफी’ आत्मचरित्राची प्रचंड विक्री झाली.

आंध्र प्रदेशातील मदनपल्लेमध्ये सत्संग फाउंडेशन आणि मानव एकता मिशनच्या माध्यमातून ते समाजाला शिकवण आणि मार्गदर्शन करीत अत्यंत साधे जीवन व्यतीत करीत आहेत.

त्यांचे कार्य जितके मोठे आणि सर्वव्यापी आहे, तितकेच मोठे कार्य पाणी या क्षेत्रात करणारे पाणीवाले बाबा म्हणून भारतभरात प्रसिद्ध असलेले डॉ. राजेंद्रसिंह यांचे मोलाचे मार्गदर्शन व हातभार या अविरल गोदावरी चळवळीसाठी लाभत आहे.

राजेंद्रसिंह राणा यांनी राजस्थानात जलक्रांती घडवून आणली, तिथे ‘जोहड’ (नद्यांवरील मातीचे बंधारे) निर्माण करण्याने ते विशेष प्रसिद्धीला आले. राजस्थानच्या वाळवंटातील अनेक नद्या त्यांनी पुनरुज्जीवित केल्या.

२००१ मध्ये त्यांना ‘रेमन मॅगसेसे’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे दोन्ही दिग्गज गोदावरी नदी व ब्रह्मगिरी या नैसर्गिक साधनसंपत्तीसाठी मैदानात उतरले असून, त्यांची धडाडी तरुणांना लाजवेल, अशीच आहे.

गोदामाईच्या हाकेला ‘ओ’ देऊन नैसर्गिक स्रोत खुले करण्याचे महत्कार्य अविरल गोदावरी आणि सत्संग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हाती घेण्यात आले. त्या दृष्टिकोनातून त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरीवर कामाला सुरवातही झाली असून, काम प्रगतिपथावर आहे.

ब्रह्मगिरीवर जेथे गोदामाईचा उगम होतो, तेथून प्रवाहाच्या दिशेने जवळपास १०८ कुंड असून, त्यातील काही कुंड स्वच्छ करण्याचे काम झाले आहे. या कुंडांचे लोकार्पण श्री एम व डॉ. राजेंद्रसिंह यांच्या हस्ते आणि प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.

यानिमित्त २ व ३ ऑक्टोबरला नाशिकमध्ये आध्यात्माची गंगा अवतरणार आहे. जयपूर येथे झालेल्या ‘सी २०’ कॉन्क्लेव्हमध्ये डॉ. राजेंद्रसिंह यांनी बनवलेला गोदामाईच्या पुनरुज्जीवनाचा आराखडा केंद्रीय मंत्रिमंडळासमोर यशस्वीपणे अतिशय दमदारपणे सादर झाला.

नदी कशी वाहती होईल, याविषयी झालेली सकारात्मक चर्चा अखंड कार्याच्या रूपाने सुरू झाली आहे. आध्यात्म हे केवळ कर्मकांडापुरते मर्यादित न ठेवता त्याला कामाची जोड देऊन त्यातून शहराचा, पर्यायाने नागरिकांचा विकास साधण्याचा हा प्रांजळ प्रयत्न आहे.

कुंभमेळा २०२७ मध्ये होणार असून, तोपर्यंत ब्रह्मगिरी ते रामकुंड हा पहिला टप्पा पुनरुज्जीवनाचे काम पूर्णत्वास नेण्याचा अविरल गोदावरीचा प्रयत्न आहे. लोकसहभागातून हे काम व्हावे, अशी श्री एम तसेच डॉ. राजेंद्रसिंह यांची मनस्वी इच्छा आहे.

त्यामुळे या कामी नाशिककरांना हाक देण्यात आली आहे. ब्रह्मगिरी ते रामकुंडादरम्यान गोदावरी पूर्ण वाहती व्हावी, काँक्रिटीकरण निघावे, नैसर्गिक स्रोत सुरू व्हावेत, ब्रह्मगिरीवरील १०८ कुंड गोदावरीचे, त्यातील जास्तीत जास्त पुनरुज्जीवन व्हावे असा अविरल गोदावरीचा प्रयत्न आहे.

हे सर्व लोकसहभागातून झाले पाहिजे. गोदावरी वाहती करणे हे प्रत्येक नाशिककराला मनापासून वाटले पाहिजे. प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, नुसते आध्यात्म करून उपयोग नाही, त्याला कार्याची जोड पाहिजे, या प्रेरणेतून हे काम होत आहे.

गोदावरी स्वच्छता, आध्यात्म संवाद व कुंडांचे लोकार्पण

येत्या २ आणि ३ ऑक्टोबरला होत असलेल्या कार्यक्रमांतर्गत सोमवारी (ता. २) सकाळी साडेसातला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आध्यात्मिक व क्रियायोगाचे गुरू तसेच पाणी चळवळीचे प्रणेते श्री एम आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ, रेमन मॅगसेसे पुरस्कार विजेते, पाणीवाले बाबा म्हणून संपूर्ण भारतवर्षात प्रसिद्ध असलेले डॉ. राजेंद्रसिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत आनंदवली ते रामकुंड ‘प्लास्टिकमुक्त नाशिक- प्लास्टिकमुक्त गोदावरी’ या चळवळीचा प्रारंभ होत आहे.

सायंकाळी साडेसहा ते साडेआठदरम्यान शंकराचार्य संकुल, डॉ. कुर्तकोटी सभागृह येथे श्री एम यांचे ‘आध्यात्म आणि सेवा’ या विषयावर मार्गदर्शन व संवाद होणार आहे.

मंगळवारी (ता. ३) सकाळी साडेसातला ब्रह्मगिरीवरील कुंडांचे पुनरुज्जीवन, ‘माती अडवा- पाणी जिरवा’ संकल्पना व प्लास्टिकमुक्त परिसर या चळवळीचा प्रारंभ करण्यात येणार आहे. या वेळी माझे झाड (माय ट्री) या संकल्पनेचा प्रारंभही करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT