Jal Jeevan Mission News esakal
नाशिक

Jal Jeevan Mission: अद्याप 14 योजनांवर निर्णयाची प्रतिक्षा! ‘जलजीवन’च्या वनविभागाकडील प्रलंबीत 25 योजना मार्गी

सकाळ वृत्तसेवा

Jal Jeevan Mission : जिल्ह्यातील जलजीवन मिशनअतंर्गत कामांच्या तक्रारी सुरू असताना वनविभागाकडे एकूण प्रलंबित असलेल्या ३५ पैकी तब्बल २५ योजना मार्गी लागल्या आहेत. वन विभागाचे सचिव यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

२५ योजना मार्गी लागलेल्या असल्या तरी, वनविभागाकडे अद्याप १४ योजनांवर निर्णय होण्याची प्रतिक्षा आहे.

या प्रलंबित योजना लवकर तोडगा काढण्याचे निर्देश वनविभागाचे सचिव यांनी स्थानिक कार्यकारी अभियंता व वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. (Awaiting Decision on 14 Schemes Pending 25 schemes from forest department of Jal Jeevan mission nashik)

जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून जलजीवन मिशनच्या १२२२ योजनांना कार्यादेश दिले असून, त्यातील जवळपास ७७ कामे अद्याप सुरू झालेली नाहीत. या सुरू न झालेल्या ७७ कामांपैकी २२ कामांमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे बदल केले असून त्या बदलांना मान्यता घेण्यासाठी मंत्रालयात प्रस्ताव पाठविले आहेत.

या पाणीपुरवठा योजनांची निविदा प्रक्रिया राबवताना मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्या असून, ठराविक ठेकेदारांना मोठ्या संख्येने कामे देण्यात आली आहेत. तसेच सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना ठरवून दिलेल्या प्रमाणात कामे मिळाली नाहीत.

त्याचप्रमाणे योजनेचा आराखडा तयार करताना प्रत्यक्ष पाहणी न करणे, उद्भव विहिरींसाठी जागा निश्चित न करणे, वनविभाग, जलसंपदा विभाग यांच्या जागेत विहिरीसाठी आराखड्यापूर्वी परवानगी न घेणे, खासगी शेतकऱ्यांच्या जागेत उद्भव विहीर प्रस्तावित करण्यापूर्वी जागा हस्तांतरित न करणे यामुळे योजनेचे काम प्रत्यक्ष सुरू करताना अनेक अडचणी येत आहेत.

यात वनविभागातील जागेत काही योजना असल्याने त्या योजना सुरू होण्यास अडथळा येत होता. याबाबत राज्य शासनाकडे तक्रारी गेल्या होत्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यानुसार व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे वन विभागाचे सचिव, जलजीवन मिशनचे संचालक अमित सैनिक यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता.२६) झालेल्या बैठकीत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता, पूर व पश्चिमचे वन सरंक्षक अधिकारी सहभागी झाले होते.

या बैठकीत वनविभागाकडील प्रलंबित असलेल्या पाणीपुरवठा योजनांवर चर्चा झाली. यात वनविभागात ३९ योजना असून त्यांची परवानगी नसणे, जागा वाद, विहीर खोदाई आदींबाबत अडचणी होत्या.

यातील २५ योजनांवर तोडगा काढण्यात आला असून या योजना मार्गी लावण्यात आल्या आहेत. या योजनांचे काम लवकर सरू करण्याचे निर्देश सैनिक यांनी यावेळी दिले. १४ प्रलंबित असलेल्या योजनांसाठी पुन्हा बैठक घेतली जाणार आहे.

त्यासाठी स्थानिक पातळीवर बैठक घेऊन प्राथमिक तोडगा काढण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. या योजनाही लवकर मार्गी लावल्या जातील असे कार्यकारी अभियंता सोनवणे यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Video: चार सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; स्मृती इराणी घेणार सभा; नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates live : शिवसेना शिंदे गटाची जाहिरात, उबाठाला डिवचण्याचा प्रयत्न?

गोफण | बॅगा तपासल्या अन् पैसे हरवले

Beed Assembly Election News : एकीकडे स्थलांतर दुसरीकडे मतदानाचे नियोजन; मुकादमांच्या मध्यस्थीने प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे प्रयत्न

महाविकास आघाडीच्या 'त्या' सभेला शरद पवार का आले नाहीत? सांगण्यासारखंच काय असतं तर..; काय म्हणाले उदयनराजे?

SCROLL FOR NEXT