District Surgeon Dr. while receiving the award from the guardian minister Dadaji Bhuse on Republic Day. Charudatta Shinde. Along with Police Commissioner Sandeep Karnik Divisional Commissioner Radhakrishna Game esakal
नाशिक

Nashik: महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत जिल्हा रुग्णालयाला पुरस्कार! प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

विनामूल्य आणि दर्जेदार उपचार मिळताना गरजू रुग्णांना खिशाला कात्री न लागता मोफत उपचारसाठी शासकीय योजनेअंतर्गत करण्यात येतात.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : विनामूल्य आणि दर्जेदार उपचार मिळताना गरजू रुग्णांना खिशाला कात्री न लागता मोफत उपचारसाठी शासकीय योजनेअंतर्गत करण्यात येतात.

यावर्षी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हा शासकीय रुग्णालयास प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते जिल्हा शल्य चिकित्सक डॉ चारुदत्त शिंदे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. (Award to District Hospital under MPJAY Honored by Guardian Minister bhuse on Republic Day Nashik)

जिलह्यातील सरकारी आरोग्य संस्थांमार्फत एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना राबवण्यात येतात.

विनामूल्य आणि दर्जेदार उपचार मिळताना गरजू रुग्णांना खिशाला कात्री न लागता मोफत उपचार या योजने अंतर्गत करण्यात येतात. मागील आर्थिक वर्षात केलेल्या कामकाजाचे राज्यस्तरावर मूल्यांकन करून उत्कृष्ट कामगिरी केलेल्या रुग्णालयांचा गौरव दरवर्षी करण्यात येतो.

यावर्षी उत्कृष्ट कामगिरीबद्दल नाशिक जिल्हा रुग्णालयचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते जिल्हा शल्यचिकित्सक डॉ चारुदत्त शिंदे यांना सन्मानपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला.

या योजनेच्या यशस्वितेसाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ चारुदत्त शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ निलेश पाटील, योजनेचे नोडल अधिकारी डॉ बाबासाहेब देशमुख, जिल्हा रुग्णालयातील सर्व विभागप्रमुख, सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

वर्षभरात 438 रुग्णांची शस्रक्रिया

वर्षभरात एकूण 438 रुग्णांना या योजनेअंतर्गत विनामूल्य शस्त्रक्रिया आणि उपचार जिल्हा रुग्णालयात करण्यात आलेले आहेत.

जिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्त शस्त्रक्रिया, अस्थिरोग शस्त्रक्रिया, जळीत कक्ष उपचार आणि शस्त्रक्रिया, बाल अतिदक्षता विभागातील उपचार, जनरल सर्जरी, कान नाक घसा विभागाच्या शस्त्रक्रिया, अतिदक्षता विभागातील विशेषज्ञ उपचार या सर्व विभागांनी उत्कृष्ट कामकाज करून या योजनेचा लाभ रुग्णांना दिला.

प्रथमच पुरस्कार

राष्ट्रीय स्वास्थ्य प्राधिकरण दिल्ली यांचे कडून जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कार प्राप्त यादी मध्ये जिल्हा रुग्णालय नाशिक या शासकीय संस्थेचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे.

योजना सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच इतर रुग्णालयांना मागे टाकून जिल्हा रुग्णालय नाशिकला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे.

"अस्थिरोग शस्त्रक्रिया, नवजात बालकांवर उपचार, मेंदू विकारावरील शस्त्रक्रिया जळीत रुग्णांवरील उपचार या विभागामार्फत जिल्हा रुग्णालय नाशिक येथे एकत्रित आयुष्यमान प्रधानमंत्री भारत योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनामध्ये रुग्ण समाविष्ट करून त्यांना निशुल्क लाभ देण्यात आला. यापुढेही जास्तीत जास्त रुग्णांना लाभ देण्यासाठी जिल्हा रुग्णालय आणि संदर्भ सेवा रुग्णालय प्रयत्नशील असतील."

- डॉ चारुदत्त शिंदे, जिल्हा शल्य चिकीत्सक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

Ashok Chavhan : ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला.....अशोक चव्हाण यांची बाळासाहेब थोरात आणि देशमुखांवर खोचक टीका

Sangamner Result: संगमनेरमध्ये पराभवाचा बदला पराभवानेच! ४० वर्षांची कारकीर्द ४१ वर्षांच्या तरुणाने संपवली; नेमकं काय घडलं?

Zimbabwe beat Pakistan: यांना झिम्बाब्वेने हरवले... पाकिस्तानचे ६ फलंदाज ६० धावांत तंबूत, मोहम्मद रिझवाच्या संघाची गेली लाज

SCROLL FOR NEXT