Senior Police Inspector Suresh Awhad and police while handing back the stolen mobile phone to the student in a private class. esakal
नाशिक

Nashik News : चोर होता होता राहिला! पोलिसांच्या समुपदेशनाचा असाही परिणाम

अनेकदा लालसेपोटी तर कधी गरजेपोटी चुकीच्या वा गुन्हेगारी मार्गाला जातो. मात्र, वेळीच चुकीच्या मार्गाची जाणीव करून दिली तर गुन्हेगारीकडे वळून पाहणाऱ्यालाही रोखता येऊ शकते.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : अनेकदा लालसेपोटी तर कधी गरजेपोटी चुकीच्या वा गुन्हेगारी मार्गाला जातो. मात्र, वेळीच चुकीच्या मार्गाची जाणीव करून दिली तर गुन्हेगारीकडे वळून पाहणाऱ्यालाही रोखता येऊ शकते. अशीच एक चोरीची घटना घडली.

परंतु वेळीच पोलिसांनी केलेल्या समुपदेशनामुळे ‘तो’ चोर होता होता राहिला. अशावेळी तक्रारदारांनीही सामंजस्य दाखविल्याने ‘तो’ समोर आला नसला तरी त्याच्यातला चोरीच्या वृत्तीवर त्याने मात केली हे महत्त्वाचे. (awareness of wrong path is given effect of police counselling nashik news)

शहरात अनेक खासगी क्लासेस आहेत. सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खासगी क्लासचा दुपारी जेवणाची सुट्टी झाली. त्यावेळी त्या वर्गातील सर्व विद्यार्थी जेवणासाठी वर्गाबाहेर गेले. यातील एका विद्यार्थिनीने तिची बॅग वर्गातच ठेवली.

बॅगमध्येच तिने तिचा मोबाईल ठेवला होता. ती जेव्हा जेवण करून परत वर्गात आली असता, तिच्या बॅगेतून मोबाईल लंपास झाला होता. ही बाब तिने तत्काळ तिच्या पालकांना सांगितले. पालकही क्लासमध्ये आले. मोबाईलबाबत विचारणा केली गेली परंतु कोणीही कबुल झाले नाही.

अखेरिस पालकांनी सरकारवाडा पोलीस ठाणे गाठले आणि घडलेली घटना सांगितली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड आणि गुन्हेशोध पथक त्या क्लासमध्ये पोहोचले. एका वर्गात सुमारे २०० विद्यार्थी होते. त्यावेळी पोलिसांनी क्लासच्या संचालकांना विश्वासात घेत थेट वर्गात प्रवेश केला.

पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य आणि समोर असलेल्या विद्यार्थ्यांची मानसिकता ओळखून त्यांना घडलेल्या घटनेची जाणीव करून दिली. तसेच, मोबाईल चोरीला गेल्यापासून कोणीही वर्गाबाहेर गेलेले नाही. त्यामुळे मोबाईल चोरणारा हा आपल्यापैकीच एक कोणीतरी आहे, हे ओळखून त्याचा तपास सुरू झाला तर त्याचे काय-काय दुष्परिणाम होतील याची जाणीव समुपदेशनाच्या माध्‌यमातून पोलिसांनी करून दिली.

चोरीचा गुन्हा दाखल झाला आणि पोलिस तपासात तो निष्पन्न झाला तर त्यातून त्या विद्यार्थ्याचे संपूर्ण आयुष्य खराब होऊ शकते याचीही जाणीव पोलिसांनी करून दिली. त्यानंतर, गुन्हेशोध पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मोबाईलचे ‘लोकेशन’ तपासले असता, मोबाईल बाथरुममध्ये असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांच्या समुपदेशनानंतर ज्याने मोबाईल चोरला होता, त्याने मोबाईल बाथरुममध्ये नेऊन ठेवला होता. पोलिसांनी तो मोबाईल पुन्हा विद्यार्थिनीकडे सुपूर्द केला. पोलिसांनी वेळीच केलेले समुपदेशन आणि त्या विद्यार्थ्यानेही झालेली चूक दुरुस्त करण्याची दाखविलेली तयारी यामुळे एक विद्यार्थी चुकीच्या मार्गाने गेला असता तो गेला नाही याचे समाधान पोलिसांनी व्यक्त केले.

सदरची कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड, पोलिस निरीक्षक सुरेखा पाटील, उपनिरीक्षक भटू पाटील, अंमलदार निलेश वायंकडे, निलम चव्हाण, संदिप सोनावणे यांनी केली.

"गुन्हा उकल होण्यापेक्षा गुन्हेगार होण्यापूर्वीच कोणाला तरी योग्य दिशेने वाटचाल करण्याची संधी मिळाली हे आमच्यासाठी व समाजासाठी महत्त्वाचे आहे. लालसेपोटीच पहिला गुन्हा घडत असतो. त्यातूनच गुन्ह्यांची सुरवात होते."- सुरेश आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सरकारवाडा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT