Ayush wins in JEE Mains result Huge success of Nashik students  esakal
नाशिक

JEE Mains Result: जेईई मेन्‍समध्ये आयुषची बाजी! नाशिकच्‍या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

या परीक्षेत आयुष गजेश्‍वर याने ९९.९९ पर्सेंटाईल मिळविताना नाशिकच्‍या स्‍तरावर आपला ठसा उमटविला.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : बहुप्रतिक्षित जॉइंट एन्ट्रन्स एक्‍झाम (जेईई) मेन्‍स परीक्षेचा निकाल मंगळवारी (ता.१३) जाहीर झाला. जानेवारी सत्रात घेण्यात आलेल्‍या बी.ई/बी.टेक. शिक्षणक्रमाच्‍या प्रवेशासाठीच्‍या पेपर क्रमांक एकचा निकाल जाहीर केला आहे.

या परीक्षेत आयुष गजेश्‍वर याने ९९.९९ पर्सेंटाईल मिळविताना नाशिकच्‍या स्‍तरावर आपला ठसा उमटविला. (Ayush wins in JEE Mains result Huge success of Nashik students news)

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये आयआयटी व यांसारख्या राष्ट्रीय स्‍तरावरील संस्‍थांमध्ये प्रवेशासाठी जेईई मेन्‍स परीक्षेचे आयोजन केले होते. जानेवारी सत्रातील परीक्षेचे नॅशनल टेस्टिंग एजन्‍सीतर्फे राष्ट्रीय स्‍तरावर आयोजन केले होते.

२७ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत झालेल्‍या जेईई मेन्‍स पेपर क्रमांक एकसाठी देशभरातून १२ लाख २१ हजार ६२४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ११ लाख ७० हजार ०४८ विद्यार्थी या परीक्षेला सामोरे गेले होते.

शंभर पर्सेंटाईल मिळविणाऱ्या २३ पैकी तिघे महाराष्ट्राचे

या परीक्षेत राष्ट्रीय स्‍तरावर २३ विद्यार्थ्यांनी शंभर पर्सेंटाईल मिळविले आहेत. यात आर्यन प्रकाश, नीलकृष्ण गर्जे आणि दक्षेश मिश्रा अशा महाराष्ट्रातील तिघा विद्यार्थ्यांनी शंभर पर्सेंटाईल मिळविण्याचा बहुमान पटकावला.

स्‍पेक्‍ट्रमच्‍या २९ विद्यार्थ्यांना ९९ पर्सेंटाईल

येथील स्‍पेक्‍ट्रमच्‍या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली आहे. क्‍लासच्‍या २९ विद्यार्थ्यांनी ९९ पर्सेंटाईलपेक्षा अधिक गुण मिळविले. मुलांमधून आयुष गजेश्‍वर याने ९९.९९ पर्सेंटाईल तर मुलींमधून खुशी कुचेरिया हिने ९९.९८ पर्सेंटाईल गुण मिळविले. आयुषसह कलश लुंकड यांनी गणितात शंभर पर्सेंटाईल मिळविले.

खुशीने भौतिकशास्‍त्रातून शंभर पर्सेंटाईल मिळविले. भाग्‍येश कोथळकरने रसायनशास्त्रात ही कामगिरी केली. स्‍पेक्‍ट्रमचे तज्‍ज्ञ शिक्षक व कपिल जैन यांचे यशस्‍वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

रेझोनन्‍सच्‍या विद्यार्थ्यांची परीक्षेत चमकदार कामगिरी

येथील रेझोनन्‍सच्‍या विद्यार्थ्यांनी परीक्षेत चमकदार कामगिरी केली आहे. येथील समेरा पांडा हिने ९९.९७ पर्सेंटाईल मिळविले. सोहम डोखळे (९९.९१ पर्सेंटाईल), अनिरुद्ध महापात्रा (९९.८८ पर्सेंटाईल), मंदार देशमुख (९९.८१ पर्सेंटाईल), संकल्‍प जोशी (९९.५२ पर्सेंटाईल), सिद्धी बोरसे (९९.४९ पर्सेंटाईल) यांच्‍यासह इतर विद्यार्थ्यांनी यशस्‍वी कामगिरी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT