सिन्नर : शहरातील एसटी कॉलनी परिसरातील १२ वर्षीय कृष्णा दत्तू थोरे याला फूस लावून पळवून नेल्याची घटना ४ जूनला घडली होती. तथापि, तब्बल दोन महिन्यांनंतर या मुलाचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. कृष्णा घरी परतल्याने कुटुंबियांचा जीव भांड्यात पडला. (Baby Krishna came Home After 2 Months Nashik Latest marathi news)
कृष्णा बेपत्ता झाल्याबाबत त्याचे वडील दत्तू थोरे यांनी पोलिसांत माहिती दिली होती. त्याआधारे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपासचक्रे फिरविली.
तब्बल दोन महिने या मुलाचा शोध सुरू होता. नातेवाइकांकडेही शोध घेण्यात आला. मात्र, तो मिळून आला नाही. आठवडाभरापूर्वी अज्ञात व्यक्तीच्या मोबाईलवरून दत्तू मोरे यांच्या मोबाईलवर मिस कॉल पडला.
त्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित मोबाईल स्वीच ऑफ होता. तांत्रिक विश्लेषण करीत पोलिसांनी माहिती काढली. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन चौधरी, पोलिस कर्मचारी राहुल हिंगोले यांनी तपासचक्रे फिरविली.
त्यात कृष्णा माहिम-माटुंगा (मुंबई) येथील डेव्हीड ससून चिल्ड्रेन्स होममध्ये असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी कृष्णाच्या पालकांसह तिथे पाहणी केली असता, कृष्णा मिळून आला. त्याला सिन्नर येथे आणले.
दरम्यान, कृष्णा रागाच्या भरात मावशीकडे जाण्यासाठी नाशिक रोड रेल्वेस्थानकातून रेल्वेने कल्याणपर्यंत पोचला. मात्र, पत्ता विसरल्याने त्याचा बालसुधारगृहातील कार्यकर्त्यांशी संपर्क आला. त्यानंतर त्यांनी कृष्णाला माटुंगा येथे सुरक्षित ठेवले होते, असे पोलिस उपनिरीक्षक चौधरी यांनी सांगितले.
थोरे कुटुंबाची विचारपूस
कृष्णा थोरे घरातून दोन महिने बेपत्ता असल्याने सर्वजण त्याची अनेक ठिकाणी विचारपूस करीत होते. सिन्नर तालुक्यासह सार्वजनिक ठिकाणी त्याचे छायाचित्र लावले होते. सिन्नर पोलिसांनी यांनी अनेक ठिकाणी शोध मोहीम सुरू ठेवली होती. तो सापडल्याची वार्ता सिन्नर शहरात पसरताच अनेकांनी थोरे कुटुंबाची विचारपूस करीत सिन्नर पोलिसांचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.