bacchu kadu esakal
नाशिक

'त्या' बहुचर्चित विवाहात बच्चू कडू साधे फिरकलेही नाही!

प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : "तुम्ही लग्न लावा, लग्न कोण थांबवतो मी बघतो. मी लग्नाला येईल व नाचेनदेखील," असे वचन देणारे राज्यमंत्री बच्चू कडू (bacchu kadu) मात्र ऐनवेळी या लग्नात साधे फिरकलेदेखील नाही. त्यामुळे हा विषय नागरिकांसाठी चर्चेचा ठरला. राज्यभरात चर्चेचा ठरलेला व नंतर रद्द झालेला तो आंतरधर्मीय विवाह (hindu-muslim-inter-religious-wedding) सोहळा अखेर नाशिकमध्ये पार पडल्याने वधू-वराच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला. नाशिक येथे महिन्यापासून आंतरधर्मीय विवाहाची चर्चा सुरू होती. त्यात अनेक वादही झाले. सुरवातीला सोशल मीडियावर आलेली लग्नपत्रिका बघून अनेकांनी या विवाह सोहळ्याला विरोध दर्शविला होता. त्यानंतर राज्यमंत्री बच्चू कडू (bachhu kadu) यांनी संबंधित कुटुंबांची भेट घेत हा विवाह सोहळा कसा होत नाही तेच बघतो, एवढेच नव्हे, तर या विवाह सोहळ्याला हजेरी लावून नाचतोदेखील असे आव्हानात्मक वक्तव्य केले होते. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच चिघळले होते. मुलीच्या विवाहास काही जणांकडून विरोधही झाला. पण तरीही हा विवाह गुरुवारी (ता.२२) चांडक सर्कलजवळील आलिशान हॉटेलमध्ये अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. (bacchu-kadu-absent-in-hindu-muslim-inter-religious-wedding-ceremony-jpd93)

अखेर ‘तो’ बहुचर्चित आंतरधर्मीय विवाह झालाच!

हिंदू व मुस्लिम दोन्ही पद्धतीने हा विवाह लावण्यात आला. या विवाह सोहळ्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्र सेवा दल व छात्रभारती यांचे कार्यकर्ते पाठिंब्यासाठी उपस्थित होते. संविधानाला अभिप्रेत असणारी ही कृती असल्याचे समाधान कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

या लग्नास मुलीच्या जात पंचायतीने प्रखर विरोध दर्शविला होता. विवाहाचे पौरोहित्य करणाऱ्या पुरोहितावर सामाजिक बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. असे करणे म्हणजे जात पंचायतच्या सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याचा भंग आहे, हे लक्षात आणून दिल्यानंतर विरोध मावळला व विवाह सोहळा शांतपणे पार पडला. -कृष्णा चांदगुडे, कार्यवाह, अंनिसचे जात पंचायत मूठमाती अभियान

भविष्यात मुलीचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही वडील व त्यांच्या कुटुंबीयांची समजूत घातली. सुरवातीला त्यांनी समर्थन दर्शवून हा विवाह सोहळा रद्द झाल्याचे लेखी पत्रदेखील दिले. मुलगा शोधून देण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारली. नंतर मात्र आमच्याशी दगाबाजी करून कुटुंबीयांनी गुपचूप विवाह लावला. समाज त्यांना कधीच माफ करणार नाही. आजपासून आमचा व त्यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध राहाणार नाही. - गजू घोडके, जिल्हाप्रमुख, ओबीसी सुवर्णकार समाज, नाशिक

विवाह सोहळा अगदी आनंदात पार पडला. कुठल्याही प्रकारचे विघ्न आले नाही. जवळचे सर्व थोडेच शुभचिंतक उपस्थित होते. सहकार्याबद्दल सर्वांचे धन्यवाद! - प्रसाद आडगावकर, मुलीचे वडील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT