Bacchu Kadu News esakal
नाशिक

Nashik News : शेतकरी, कष्टकर्यांसाठी गोळी मारली असती तर केलं असतं स्वागत : आ. बच्चू कडू

बंदुकीतून गोळीबार केला तो काही देशासाठी नाही केलेला. शेतकरी, मजूर, कष्टकर्यांसाठी गोळी मारली असती तर आम्ही त्यांचे स्वागतच केले.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : बंदुकीतून गोळीबार केला तो काही देशासाठी नाही केलेला. शेतकरी, मजूर, कष्टकर्यांसाठी गोळी मारली असती तर आम्ही त्यांचे स्वागतच केले असे, अशी उपरोधिक टीका उल्हासनगरमधील गोळीबारीबाबत प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व आमदार बच्चू कडून यांनी केली.

तसेच, राज्यातील सामाजिक एकोपा महत्त्वाचा असून, राजकीय वक्तव्यांकडे जनतेने दूर्लक्ष करावे असेही आवाहन आ. कडू यांनी यावेळी केले. (Bacchu kadu statement of If bullet had been fired for the farmers and laborers it would have been welcomed nashik news)

नाशिकमध्ये सामाजिक कार्यक्रमानिमित्ताने आले असता, आमदार बच्चू कडू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आ. कडू म्हणाले, राज्यात शेतकरी, कष्टकरी, मजुरांचे गंभीर प्रश्न आहेत. कापूस, कांदा, सोयाबीनचे भाव गडगडल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. कांदा निर्यातबंदीमुळे बांगलादेशाने संत्र्यावर बंदी घातली आहे. त्याचा थेट परिणाम शेतकर्यांवर झाला असून याबाबत शासनाचा निषेधही व्यक्त केला.

वाद नको, एकोपा महत्त्वाचा

सध्या राज्यात आगामी निवडणुकीच्या तोंडावर जाती-पातीचे, धर्मा-धर्माचे राजकारण होते आहे. राज्यातील सामाजिक एकोपा टिकवून ठेवण्यासाठी राजकीय नेत्यांच्या प्रक्षोभक वक्तव्यांकडे जनतेने दूर्लक्ष करावे. अशा वादामुळे समाजाचे महत्त्वाचे व हक्काचे प्रश्न मागे पडत असल्याचे आ. कडू म्हणाले.

शिवजयंतीनंतर बोलणार

मराठा आरक्षण आणि भुजबळ या संदर्भातील मुद्यांवर आपण शिवजयंतीनंतर सविस्तर पत्रकर परिषद घेऊन बोलणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज अठरापगड जातींना सोबत घेऊन लढले. आज त्यात वाद होऊन एकोपा बिघडायला नको. दोन समाजात, धर्मांत वाद होईल असे कोणतेही वक्तव्य आपण करणार नसल्याचेही आ. कडू म्हणाले.

सुळे, राऊतांना कोपरखळ्या

उल्हासनगर गोळीबार प्रकरणावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली असता, त्यावर आ. कडू यांनी, हे सारे राजकारण आहे. त्याला काही अर्थ नसून त्याकडे लक्ष देऊ नये असे म्हणाले तर, खासदर राऊत यांनी मीडियासमोर मागण्या करण्याऐवजी विधानसभा, लोकसभेत त्या मांडाव्या आणि कागद घेऊन फिराव असा उपरोधिक कोपरखळ्या मारल्या.

तरच भाजपसोबत

लोकसभा जागा वाटपावेळीच विधानसभेच्या जागावाटप झाल्या आणि त्यात प्रहारला वाटा मिळाला तरच आम्ही भाजपासोबत राहू. प्रहार फक्त विधानसभेचा दावा करीत आहे. अन्यथा जळगाव, अमरावतीसह आणखी दोनेक ठिकाणच्या जागा आम्ही लढणार आहोत. आम्ही शेतकरी, मजुर, कष्टकर्यांच्यासाठी महादेव जानकर, राजू शेट्टी यांच्यासोबतही चर्चा करणार असल्याचे आ. कडू म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : हेलिपॅडवर बॅग तपासणीसाठी कुणी पुढं आलं नाही, उद्धव ठाकरे म्हणाले- आज मला.....

Nashik Vidhan Sabha Election : कलम 370 वर काय, शेतकरी आत्महत्यांवर बोला; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे

Maharashtra Vidhan Sabha election 2024: पंधरा लाख मतदारांचं ऊसतोडणीसाठी स्थलांतर; हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

Ajit Pawar : 'किंगमेकर' किंवा 'स्पॉयलर' होण्यात मला रस नाही, अजित पवार असं का म्हणाले?

Latest Maharashtra News Updates : आमदार डॉ. मनीषा कायंदे यांची हुसेन दलवाईंवर टीका

SCROLL FOR NEXT