Sakal Exclusive : चित्रपटातील गाणी, अल्बममध्ये बॅकग्राउंड काम करणारे नाशिकमधील डान्सर विविध पातळीवर आजही संघर्ष करताना दिसत आहे.
छोट्या शहरातून आलेल्या डान्सरची संघर्षमय गाथा सांगणारे एबीसीडीचे दोन भागातील चित्रपट येऊनही त्यांच्या संघर्षाला नवा आयाम मिळताना दिसत नाही, नाशिकमध्ये गत काही काळात बॅकग्राउंड डान्सर म्हणून नावारूपाला आलेला ब्लर डान्स ग्रुपचा संघर्ष युवकांना प्रोत्साहन देणारा ठरत आहे. (background dancer in Nashik is still struggling at various levels news)
नाशिकमधील कलाकार, कलावंत, बॅकस्टेज आर्टिस्ट, डान्सरच्या मानधनाचा विषय नेहमीच चर्चेचा मुद्दा ठरत आहे. नाशिकच्या कलाकारांना सन्मानपूर्वक वागणूक, मानधन दिले जात नाही ही सगळ्यांची ओरड आहे. तरीही नाशिकमधील सर्वच कलाकार, डान्सर नोकरी करून अभिनय, डान्सर होण्याचा छंद जोपासताना दिसत आहे.
मात्र, हे करीत असताना नाशिकमध्ये मुंबई, पुण्याच्या तुलनेत मानधन कमी मिळत असल्याने त्यांना मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागत असून, या संघर्षाला नवा आयाम मिळावा अशी आशा नाट्य, अभिनय, नृत्य आदी क्षेत्रातील मंडळींना आहे.
ब्लर डान्स ग्रुप नाशिकमध्ये दहा वर्षांपासून कार्यरत आहे. त्यांचे पहिल्या दिवशी असलेली ग्रुपमधील सहा सदस्यांची संख्या आज शंभरावर पोचली आहे. नाशिकमधील ब्लर डान्स ग्रुपचे सदस्यांनी मुंबई, हैदराबाद, पुणे, बंगळूर आदी ठिकाणी काम केले आहे.
मात्र तेथे तीन हजारापर्यंत मिळत असलेले मानधन व त्याच कामाचे नाशिकमध्ये मिळणाऱ्या मानधनाची तुलना होऊ शकत नसल्याचे ते सांगतात.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यांनी काम केलेल्या गाण्यांनी रेकॉर्ड प्रस्थापित केले असले तरी त्यांना हवी ती ओळख आजही मिळालेली नसल्याचे ते खंत व्यक्त करतात.
डान्सरमध्ये पन्नासवर मुलींची संख्या नाशिकमध्ये बॅकग्राउंड डान्सर म्हणून पन्नासवर मुलींची संख्या आहे. ज्या शहरात शूटिंग असेल, त्या ठिकाणी न घाबरता काम करत असून त्यांच्या मेहनतीला ओळख मिळून समाजासमोर यश दिसावे असे या ग्रुपमधील डान्सर सांगतात.
सरावाचेही मानधन मिळावे
अलीकडे सोशल माध्यमांवरील व्हायरल व्हिडिओमुळे अनेकांना ओळख मिळाली आहे. पण तीच ओळख अनेक चित्रपटातील गाणी, अल्बम केलेल्या बॅकग्राउंड डान्सरला मिळताना दिसत नाही. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. इतर शहरांमध्ये ग्रुपला डान्स सरावाचेही मानधन दिले जात मात्र नाशिकमध्ये हे होत नसल्याची खंत डान्सर बोलून दाखवितात.
"नाशिकमधील डान्सरने अनेक खानदेशी, मराठी, हिंदी गाण्यांमध्ये भूमिका बजावली आहे. डान्सर नोकरी करून बॅकग्राउंड डान्सरचे काम करीत आहे. दहा वर्षांपूर्वी पोलार्ड नवले यांच्यासोबत सुरू केलेल्या कामाला ओळख मिळून इतर शहरांच्या तुलनेत नाशिकमध्ये सन्मानजनक मानधन मिळावे, ही आशा आहे." -आवेश शेख, ब्लर डान्स ग्रुप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.