नाशिक : महापालिकेच्या बिटको रुग्णालयात सत्ताधारी भाजपच्या नगरसेविकेच्या पतीने चारचाकी घालून राडा केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल झाला. मात्र, या निमित्ताने पुन्हा एकदा बिटकोतील दुरवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (Bad condition at Bitco Hospital Nashik)
बिटकोतील प्रश्नाचे मूळ दुखणे कसे सुटणार?
बिटकोत अपुऱ्या कर्मचाऱ्यांअभावी डोळ्यांदेखत नातेवाइकांचा(Relatives) जीव जाताना पहाणाऱ्यांनी रुग्णालयातील दुरवस्थेच्या व्यथा मांडल्या. संशयित राजेंद्र (कन्नू) ताजणे यांच्या विरोधात बिटको रुग्णालयातील डॉक्टरांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. पोलिस संशयित ताजणेंचा शोध घेत आहेत. दुसरीकडे भारतीय जनता पक्षातही(BJP) या प्रकरणाचे पडसाद उमटले असून, सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविकेच्या पतीच्या या कृतीबद्दल भाजपकडून कदाचित कारवाई होईलही. पण बिटकोतील प्रश्नाचे मूळ दुखणे सुटणार कसे, याचे उत्तर कुणी देईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. रुग्णालयातील दुरवस्था संपणार नाही. त्याविरोधात आंदोलन करून लक्ष वेधले तरी गुन्हे दाखल होणार. लक्ष वेधले नाही तर मरण, अशी येथील स्थिती असल्याचे नाशिक रोड भागातील लोकप्रतिनिधीच आता थेट बोलू लागले आहेत.
नुसत्याच खाटा वाढल्या
महापालिकेच्या बिटको रुग्णालयातील अपुरे मनुष्यबळ ही तेथील प्रमुख अडचण आहे. रुग्णांची संख्या वाढत असताना घाईघाईत लोकभावनेच्या उद्रेक रोखण्यासाठी महापालिकेने बिटको कोविड सेंटरमध्ये(covid centre) ३०० खाटाहून थेट ७०० खाटांचे विस्तारीकरण केले. रुग्णालयात खाटा वाढल्या, मात्र कर्मचारी संख्या तेव्हढीच आहे. कर्मचारी भरतीसाठी जाहिरात काढली, महापालिकेवर कायमस्वरूपी आर्थिक बोजाच्या नावाने तात्पुरत्या स्वरूपाच्या कंत्राटी पद्धतीने जागा भरण्यास मान्यता दिली गेली. त्यातील १२ हजारांवर कोविडसारख्या महामारीत(corona virus) कर्मचारी भरण्याच्या या अपेक्षेला प्रतिसाद मिळाला नाही. किमान वेतनाच्या नियमाइतकाही पगार न मिळणाऱ्या या धोकादायक स्थितीत महापालिकेवरील आर्थिक बोजा टाळण्यासाठी हा खटाटोप अयशस्वी ठरला.
नातेवाइकांकडून सेवा
महापालिकेत मार्चपासून अनेक रुग्णांना अपुऱ्या मनुष्यबळाचा फटका बसला. तेथील अपवादाचे काही डॉक्टर(Doctor) व कर्मचारी(Medical staff) आणि परिचारिका(Nurse) सोडल्या तर प्रतिसाद मिळत नसल्याने अनेक रुग्णांचे नातेवाईकच कोविड पॉझिटिव्ह(covid positive) रुग्णांची देखभाल करीत आहेत. जेवण देण्यापासून तर त्यांचा गोळ्या वेळोवेळी देण्यापर्यंतचे काम करीत आहेत. डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील २४ मृत्यूनंतर महापालिका आयुक्तांना भेट देऊन स्वतः नातेवाईक बाहेर काढावे लागले. तेव्हापासून रुग्णांचे नातेवाईक बाहेर थांबत आहेत. तोपर्यंत रुग्णालयातील आतील दुरवस्थेचे दुःखद अनुभव घेतलेल्यांची संख्या या भागात मोठी आहे. या सगळ्यामुळे नाशिक रोडचे सगळेच लोकप्रतिनिधी प्रभागातील रहिवाशांच्या तक्रारीमुळे हैराण आहेत.
वैद्यकीय प्राधान्याचे काय?
वैद्यकीय कर्मचारी भरतीचा आर्थिक भार हा महापालिकेपुढील प्रश्न आहे. कोरोना महामारीत चांगल्या रस्त्यावर अस्तरीकरण, स्मार्टसिटीसह(Smart city) शहरभर खोदून ठेवलेले रस्ते व सरपनापासून तर अनेक ठेक्यातील उधळपट्टीबाबत यंत्रणा ढिम्मच आहे. तेथील उधळपट्टीकडे डोळेझाक करताना वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनावरून भरतीला प्रतिसाद न मिळणाऱ्या महापालिकेने महामारीत शहरातील विकासकाम की लोकांचे जीव, या प्राधान्यक्रमांचा विचार करण्याची गरज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.