kesar mango entered for sale in the market. esakal
नाशिक

Nashik News : द्राक्षनगरीत आंब्याची आवक; केशर 300, तर लालबाग 250 रुपये किलो

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : उन्हाची चाहूल लागताच प्रत्येकाला फळांचा राजा आंब्याची प्रतीक्षा असते. त्यानुसार शहरात आंब्यांची आवक सुरू झाली आहे.

केशरसह बदाम व विविध जातीचे आंबे पिंपळगाव बसवंतच्या बाजारात दाखल झाले असून, द्राक्षनगरीला केशरची भुरळ पडलेली दिसते आहे. (badam kesar and different varieties of mangoes entered the market of Pimpalgaon Baswant nashik news)

शहरात उन्हाचा कडाका वाढायला सुरवात झाली आहे. दुसरीकडे उन्हाळी फळांची आवक सुरू झाली आहे. शहरात ठिकठिकाणी फळांची दुकाने थाटली गेली आहेत. बाजारात टरबूज, खरबूज, द्राक्ष, संत्री, मोसंबी, रामफळांसह फळाचा राजा आंब्यांची आवक सुरू झाली आहे.

आजघडीला बाजारात केशर, बदामसह विविध जातीचे आंबे उपलब्ध झाले आहेत. सध्या बाजारात केशर आंबा तीनशे रुपये किलो, लालबाग आंबा २५० रुपये किलो व बदाम आंबा १५० रुपये किलो या भावात विकला जात आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

दरम्यान, दरवर्षी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर गावरान आंब्यांसह हापूस, बदाम, केशर, दशेरी यासह विविध वाणांच्या आंब्याची आवक होते. सध्या बाजारात आंब्याची मोठी आवक नसल्याने भाव वधारलेले असल्याचे चित्र आहे. अक्षयतृतीयेच्या दरम्यान बाजारात आंब्यांची मोठी आवक वाढल्यानंतर दरही खाली येण्याची शक्यता आहे.

रमजान महिन्यामुळे फळांना मागणी

सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. रमजानचा उपवास म्हणजेच, रोजा सोडण्यासाठी विविध फळांची मागणी अधिक असते. त्यामुळे केळी, आंबा, चिकू आदी फळांचा भाव काही प्रमाणात तेजीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

"उन्हाळा व रमजानच्या महिन्यामुळे फळांची मागणी वाढली आहे. आंब्याच्या आगमनाने खवय्यांची प्रतिक्षा संपली आहे." -सचिन देव, फळ विक्रेता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Rathod won in Digras Assembly Election Results 2024: माणिकराव ठाकरेंचा पुन्हा पराभूत, हायव्होल्टेज लढतीत संजय राठोड विजयी

Eknath Shinde : एकनाथ शिंदे महाविकास आघाडीपेक्षा भारी, केलीय आता पुढची तयारी

"त्याने माझ्या तब्येतीची चौकशी केली आणि..." शुटिंगमुळे थकलेल्या सलमानच्या कृतीने भारावली हिना , म्हणाली...

Prakash Solanke won Majalgaon Assembly election 2024 final Result: माजलगावमध्ये अटीतटीच्या लढतीत प्रकाश सोळंके विजयी, शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव

Ballarpur Assembly Constituency Result 2024 : बल्लारपूरमध्ये भाजपचा गुलाल! सुधीर मुनगंटीवारांनी 105969 मतांनी गड राखला

SCROLL FOR NEXT