Sudhakar Badgujar esakal
नाशिक

Sudhakar Badgujar: कथित भ्रष्टाचार प्रकरणी बडगुजरांना ‘एसीबी’कडून 26 ला मिळेल स्पष्टता

सकाळ वृत्तसेवा

Sudhakar Badgujar : अपहार प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्‍हा दाखल केल्‍यानंतर शुक्रवारी (ता. २२) पाचारण केलेल्‍या शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची विभागाने दोन तास चौकशी केली. (Badgujar will get clarity on alleged corruption case from ACB on 26th dec nashik crime news)

माहिती अधिकारात कागदपत्रे उपलब्‍ध होईपर्यंत कालावधी देण्याबाबतची त्‍यांची मागणी मान्‍य करायची किंवा नाही, याची स्पष्टता त्यांना मंगळवारी (ता. २६) दिली जाणार आहे. दुसरीकडे पोलिस यंत्रणेच्‍या चौकशीदरम्‍यान सलीम कुत्तासोबतच्‍या पार्टीबाबत लेखी उत्तर देण्याबाबतची बडगुजर यांची मागणी ग्राह्य धरली आहे.

सलीम कुत्ता याच्‍यासोबत पार्टी करतानाचा व्हिडिओ समोर आल्‍यानंतर सुधाकर बडगुजर यांच्‍या अडचणीत वाढ झाली होती. यापाठोपाठ त्‍यांच्‍याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेदेखील गुन्हा दाखल केला. डिसेंबर २००६ मध्ये स्वतःच्या कंपनीतून निवृत्ती घेतल्याचे बनावट कागदपत्रे मिळवत, महापालिकेतील विविध पदांवर कार्यरत राहून कंपनीला ठेके मिळवून दिल्‍याचा त्‍यांच्‍यावर आरोप होता.

कंपनीमार्फत २००६ ते २००९ दरम्‍यान आर्थिक लाभ घेण्याची तक्रार दाखल होती. शुक्रवारी (ता. २२) सकाळी बडगुजर एसीबीच्‍या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले. त्या वेळी अधिकाऱ्यांनी त्‍यांची दोन तास कसून चौकशी केली.

उत्तरांना यंत्रणेकडून प्रतिप्रश्‍न

चौकशीदरम्‍यान बडगुजर यांच्‍या उत्तराला यंत्रणेकडून प्रतिप्रश्‍न उपस्‍थित करण्यात आले. निवृत्तीबाबत कागदपत्रे न्‍यायालयात असून, त्‍यांच्‍या उपलब्‍धतेसाठी वेळ लागणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले होते.

मात्र ही कागदपत्रे तपास यंत्रणेकडे उपलब्‍ध आहेत. दिवाणी न्‍यायालयातील या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्‍याचे अधिकाऱ्यांनी स्‍पष्ट करत प्रतिप्रश्‍न उपस्‍थित केले. या दरम्‍यान ‘आरटीआय’मध्ये महापालिकेकडे कागदपत्र मागविले असून, ते प्राप्त होईपर्यंत आणखी काही कालावधी लागणार असल्‍याची बाजू बडगुजर यांनी मांडली.

"चौकशीसाठी सुधाकर बडगुजर हे कार्यालयात विधिज्ञासोबत हजर झाले होते. बहुतांश प्रश्नांची त्यांना उत्तरे देता आलेली नाहीत. माहिती अधिकारात कागदपत्रे उपलब्ध करत असल्याने १० जानेवारीपर्यंत मुदत त्यांनी मागितली. यासंदर्भात त्यांना पुढील चौकशीबाबत मंगळवारी (ता. २६) नोटीस बजावली जाईल." - शर्मिष्ठा वालावलकर, अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT