नाशिक : महाविद्यालयीन विद्याध्यर्थ्याचे अपहरण करून त्याचा निर्घृण खून केला. तसेच त्याच्या पालकांकडे एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा प्रकार जून २०१३ मध्ये घडला होता, या खटल्यात आज अतिरिक्त सत्र न्यायालयाने दोन आरोपीना दोषी ठरविले तर तिघांविरोधात ठोस पुरावे नसल्याने त्यांची निर्दोष मुक्तता केली.
दोषी आरोपींना येत्या गुरुवारी (ता,१५) शिक्षा सुनावली जाणार आहे. विपीन गुलाबचंद बाफना या मुलाचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्त्या कारण्यात आली होती, त्यामुळे दोषी ठरविन्यात आलेल्या दोघांना फाशी कि जन्मठेपेची शिक्षा न्यायालय ठोठावते याकडे लक्ष लागून आहे, (Bafna murder case news updates)
चेतन यशवंतराव पगारे (२५, रा.ओझर टाऊनशिप), अमन प्रकटसिंग जट (२२, रा,केवडीबन, पंचवटी) असे दोषी ठरविन्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, अक्षय उर्फ बाल्या सुरज सुळे (२१, रा.नांदुरनाका), संजय रणधीर पवार (२७, रा.महालक्ष्मी चाळ, बागवानपुरा) आणि पम्मी भगवान चौधरी (३२, रा. भारतनगर, वडाळारोड) यांची ठोस पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे, विपीन याचे ९ जुने २०१३ रोजी आरोपींनि अपहरण केले होते.
याप्रकरणी पंचवटी पोलिसात बेपत्ताची नोंद दाखल होती. यानंतर आरोपींनी त्याचा खून केला आणि त्याच्या पालकांकडे एक कोटीची खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी अपहरण, खून आणि खंडणीचा मोक्कान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गेल्या ९ वर्षापांसून जिल्हा व सत्र न्यायालयात विशेष न्यायालयात याप्रकरणी खटला सुरु होता, पाचाही आरोपी मध्यवर्ती कारागृहात आहेत, या खटल्यात सरकारी पक्षातर्फे विशेष जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी कामकाज पाहिले. तत्कालीन पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले, यात सरकारी पक्षाने ३४ साक्षीदार तपासले.
न्या. अदिती कदम यांनी या खटल्यात चेतन पगारे व अमन जट या दोघांना दोषी ठरविले. तर अन्य तिघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. सदरील खटल्याच्या पार्श्वभूमीवर कोर्टाच्या आवारात पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....
दोघांचा सहभाग सिद्ध
चेतन व अमन यांचा या गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे न्यायलयसमोरील पुराव्यावरून सिद्ध झाले. त्यांनी अपहरणानंतर जो व्हिडीओ शूट केला होता त्यात आरोपी दिसून आले. तसेच या प्रकरणात घटनेत वापरण्यात आलेला मोबाईल व कार्ड पोलिसांना मिळाले नसले तरी सीडीआर या तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी दोघं आरोपींचा सहभाग असल्याचे सिद्ध केले, याशिवायहि काही शास्त्रोक्त पुराव्याच्या आधारे सबळ पुरावे न्यायालयासमोर पोलिसांनी दिले होते. त्याआधारे न्यायालयाने दोघांना दोषी ठरविले.
असे होते प्रकरण
ओझर येथील धान्य व्यापारी गुलाबचंद बाफना यांचा मुलगा विपीन हा नाशिकमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. आरोपींची संगनमत करून ९ जून २०१३ रोजी आरोपींची त्याचे पंचवटीतून अपहरण केले. पालकांनी संपर्क साधला असता होत नसल्याने त्यांनी पंचवटी पोलिसात धाव घेत बेपत्ताची नोंद केली होती, तर दुसऱ्यादिवशी त्याचे अपहरण केल्याचे समोर आले होते, १३ जून रोजी विपीनचा मृतदेह आडगाव शिवारात आढळून आला होता, त्याच्या अंगावर आरोपींनी गुप्तीने ३६ वार केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.