Nashik News : जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असले तरी बागलाण तालुक्यातील अर्ली द्राक्ष दुबई व रशियाला निर्यात झाले आहेत.
शेतकऱ्यांनी दिवाळीचा मुहूर्त साधत निर्यातीला सुरवात केली. जिल्ह्यातील ४४ हजार ६०० शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवले आहे. (Baglan early grape leaves for Dubai Russia time of Diwali Nashik News)
जिल्ह्यातून युरोपीयन समूहातील २१ देशांसह रशिया, दुबई, चीन, मलेशिया, श्रीलंका या देशांना द्राक्षाची निर्यात होते. कोरोनामुळे दोन वर्षे निर्यात बंद होती. मात्र, यंदा जानेवारीतच निर्यातीला सुरवात झाली.
सुरवातीच्या काही दिवसांत २०० टन द्राक्षांची नेदरलँड, लॅटव्हिया आणि स्वीडनला निर्यात झाली. बागलाण तालुक्यातील अर्ली द्राक्षांच्या निर्यातीला आता सुरवात झाली आहे. रशियासह दुबईला हे द्राक्ष पाठवले आहेत.
गेल्या वर्षी जिल्ह्यातून दोन लाख टन द्राक्षांची निर्यात झाली होती. यंदा युरोपीय देशांची मागणी लक्षात घेता सव्वालाख ते दीड लाख टन द्राक्ष निर्यात होण्याची अपेक्षा आहे.
३१ डिसेंबरपर्यंत नोंदणी
‘अपेडा’च्या सहकार्याने ग्रेपनेट प्रणालीद्वारे निर्यातक्षम द्राक्षबागांची नोंदणी करण्यात येते. गेल्या वर्षी ३१ हजार ८११ शेतकऱ्यांनी निर्यातक्षम द्राक्षबागांची नोंदणी केली होती. कृषी विभागाला २०२३-२४ या वर्षामध्ये ४४ हजार ६०० बागांच्या नोंदणीचा लक्षांक देण्यात आला आहे.
३१ डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे.
निर्यातक्षम फळे व भाजीपाला नोंदणी कशी करावी, याविषयी कृषी उपसंचालक जगदीश पाटील, कृषी अधिकारी लितेश येळवे यांनी निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.