Unseasonal Rain Damage : तालुक्यात विश्रांती घेतलेल्या अवकाळी पावसाने शुक्रवारी (ता.२८) दुपारनंतर पुन्हा जोरदार हजेरी लावली. यामुळे कांद्यासह इतर शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. महिन्याभरात तालुक्यात पाच ते सहा वेळा अवकाळी, गारपीट झाल्याने तालुक्यातील शेतकरी पुरता हवालदील झाला आहे.
पहिल्या दोन ते तीन पावसानंतर पंचमाने झालेल्या नुकसानीची मदत अद्यापपर्यंत न मिळाल्याने बळिराज हवालदील झाला आहे. आता बळिराजाचे लक्ष शासनाच्या मदतीकडे लागले आहे. (Baglan taluka again hit by unseasonal rain nashik news)
तालुक्यातील पिंपळकोठे परिसरासह शुक्रवारी (ता.२८) कातरवेल, राजापूर, नवेपिंपळकोठे, भडाणे, दरेगाव, तांदूळवाडी, नांदीन, दसवेल, अंतापूर, ताहाराबाद येथे जोरदार वाऱ्याच्या पावसासह गारपीट झाली.
या पावसामुळे कांदा व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सकाळी ऊन, दुपारी ढगाळ हवामान व नंतर जोरदार अवकाळी गारांच्या पावसामुळे बळीराजाचे कंबरडले मोडले असून यापुढे कसे जगावे असा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे.
चालूवर्षी लाखो रुपये खर्च करून कांदा बियाणे विकत घेऊन कांद्याची लागवड केली होती. पण काढणीला आलेल्या कांद्यावर बेमोसमी पाऊस व गारपिटीने घात केल्याने सर्वत्र नुकसान झालेले आहे.
मागील पंधरा दिवसापूर्वी करंजाडी खोऱ्यात अशाच पद्धतीने झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. सुभाष भामरे ,आमदार दिलीप बोरसे, किसान मोर्चा भाजप प्रदेश उपाध्यक्ष बिंदू शर्मा यांनी बागलाण तालुक्यात झालेल्या कांदा, गहू, डाळिंब व इतर नुकसानीचे पाहणी करून संबंधित विभागाने तातडीने कर्तव्य बजावत पंचनामे केले. पण आर्थिक मदत अद्याप मिळत नसल्याने बळिराजा हवालदील झाला आहे.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
मोहनदरीत पोल्ट्री शेडचे मोठे नुकसान
अभोणा : कळवण तालुक्यातील अभोणा, बार्डे परिसरात दुपारी पाचनंतर वादळी वारा व विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. जोरदार वाऱ्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. शुक्रवारी येथील आठवडे बाजार असल्याने अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली.
परिसरात बहुतांश ठिकाणी कांदे काढून चाळीत साठविण्याचे काम सुरू आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतातील कांदा पावसात भिजला. वादळी वाऱ्यामुळे मिरची, टोमॅटोचे मोठे नुकसान झाले. मोहनदरी येथील पार्वताबाई चव्हाण यांचे शेतातील पोल्ट्री फार्म शेडचे वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले.
"काढणीला आलेल्या कांदा पिकावर चार ते पाच वेळा अवकाळी पाऊस झाल्याने अर्धा कांदा शेतातच सोडून द्यावा लागत आहे. जो कांदा कांदा काढला आहे तो शेतामध्ये घातलेल्या घोडीतच सडत आहे. बाजार समितीत सध्या ४०० ते ४५० रुपये भाव मिळत असल्याने बळिराजाची वाईट अवस्था झालेली आहे." -नितीन भामरे, उपसरपंच, पिंपळकोठे
"लाखो रुपये खर्च करून व रात्रंदिवस कष्ट करून पिकलेल्या कांदा माल अवकाळी पावसामुळे बाधित झालेला आहे. त्यामुळे सदर कांदा चाळीत टिकणे अशक्य असल्याने शेतकरी मार्केटमध्ये विक्रीसाठी नेत आहे. शासनाने अशा पद्धतीचा उन्हाळी कांदा विक्रीवर खर्च व उत्पन्नाच्या आधारावर तातडीने विनाअट अनुदान जाहीर करून दिलासा द्यावा."
- नानासाहेब भामरे, भडाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.