Department of Tribal Development esakal
नाशिक

Nashik News : बाळहिरडाप्रश्नी 19 ऑक्टोबरला मंत्रालयात बैठक; किसान सभेचे ठिय्या आंदोलन मागे

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : बाळहिरडा नुकसान भरपाई मिळण्याबाबत १९ ऑक्टोबरला मुंबईत मंत्रालयात बैठक घेऊन हिरडा नुकसान भरपाई देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले व डॉ. अमोल वाघमारे यांना बुधवारी (ता. ११) फोनवर चर्चा करताना दिले.

त्यामुळे नाशिक येथे अखिल भारतीय किसान सभेतर्फे तीन दिवसांपासून सुरू असलेले बेमुदत ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. (Bal Hirda issue meeting on October 9 in Ministry nashik news)

आदिवासी विकास महामंडळाने बाळहिरडा खरेदी पूर्ववत करण्यासह नुकसान भरपाईच्या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेतर्फे सोमवारी (ता. ९) बाळहिरडा उत्पादक शेतकऱ्यांनी आदिवासी विकास आयुक्तालयात ठिय्या आंदोलन सुरू केले होते. सलग दोन दिवस सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत अखेर महामंडळ प्रशासनाने आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. बैठकीत काही ठोस निर्णय झाले.

यात आदिवासी विकास महामंडळ बाळहिरडा खरेदी करेल, हिरडा खरेदीचा या वर्षाचा हमीभाव हा जानेवारी २०२४ मध्ये शेतकरी हित पाहून जाहीर केला जाईल, मार्च २०२४ पासून बाळहिरडा खरेदी महामंडळ करणार, हिरडा खरेदी करण्यासाठी ग्रामसभा सक्षम आहे की नाही असा ठराव न घेता महामंडळाने हिरडा खरेदी करण्यास हरकत नाही, असा ठराव घेतला जाईल.

जुन्नर येथील हिरडा कारखान्याविषयी आदिवासी विकासमंत्री यांच्या उपस्थितीत स्वतंत्र बैठक होईल. अकोले व जुन्नर तालुक्यांतील प्रलंबित वनधन केंद्राची मान्यता प्रक्रिया व त्यांना द्यायचे अनुदान तातडीने दिले जाईल. हिरडा नुकसान भरपाईविषयी सुधारित प्रस्ताव पुणे जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपवनसंरक्षक यांच्या सहीने विभागीय आयुक्त पुणे यांच्या कार्यालयास सादर करण्यात आला.

गुरुवारी (ता. १२) हा प्रस्ताव राज्य शासनास सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याने आंदोलन मागे घेत असल्याचे किसान सभेतर्फे सांगण्यात आले. या वेळी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, डॉ. डी. एल. कराड, अजित नवले, सुनील मालुसरे, दीपक गुजर, अमोल वाघमारे, जयदेव भांगरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मालाडमध्ये भाजपाचे उमेदवार विनोद शेलार आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT