Bishop Ludus Daniel, etc., during the Corpus Christi Mass after Mass in the Baby Jesus Pilgrimage.  esakal
नाशिक

Bal Yeshu Yatra: बाळ येशू यात्रेची उत्साहात सांगता! देश-विदेशातील 3 लाख भाविकांनी घेतले दर्शन

भारतातील एकमेव बाळ येशूचे चर्च असलेल्या नाशिक रोड येथील सेंट झेवियर्स शाळेच्या आवारातील प्रसिद्ध बाळ येशू यात्रेची रविवारी (ता.११) उत्साहात सांगता झाली.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : भारतातील एकमेव बाळ येशूचे चर्च असलेल्या नाशिक रोड येथील सेंट झेवियर्स शाळेच्या आवारातील प्रसिद्ध बाळ येशू यात्रेची रविवारी (ता.११) उत्साहात सांगता झाली.

दोन दिवसाच्या यात्रेत देश-विदेशातून आलेल्या तीन लाख भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती यात्रा संयोजकांनी दिली. यात्रेतून सुमारे एक कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. (Bal Yeshu Yatra with excitement Three lakh devotees from different states abroad took darshan nashik news)

देशभरातून भाविक खासगी वाहने, रेल्वे, एसटीने यात्रेसाठी आले होते. रविवारपर्यंत (ता.११) अडीच लाख भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती मुख्य धर्मगुरू फादर एरोल फर्नांडिस यांनी दिली.

पहिल्या दिवशी बिशप ल्युडस डॅनिअल यांच्या उपस्थितीत मुख्य मिस्सा (विशेष प्रार्थना) झाली. सकाळी सहापासून इंग्रजी, मराठी, कोकणी, तमीळ भाषेत मिळून एकूण चौदा विशेष मिस्सा झाल्या. रविवारी दुपारी एकपर्यंत सहा मिस्सा झाल्यानंतर यात्रेची सांगता झाली.

बाळ येशूला केलेला नवस फेडण्यासाठी मेणाच्या बाहुल्या तसेच खाद्यपदार्थ, गृहपयोगी वस्तू आदींची दुकाने लागली होती. शंभर पोलिस, अडीचशे स्वयंसेवक आणि त्यांना झालेली वाहतूक पोलिसांची मदत यामुळे यात्रा निर्विघ्न पार पडली.

दरवर्षी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मोठी यात्रा भरते. यात्रेला पन्नासहून अधिक वर्षांची परंपरा आहे.

मंडपात सकाळी सहा ते सायंकाळी आठपर्यंत दर तासाला इंग्रजीसह विविध भाषांमध्ये भाविकांना पवित्र मिस्सा देण्यासाठी देशभरातून फादर हजर होते. मुंबई, वसई, गोवा येथील भाविकांची संख्या लक्षणीय होती. भाविकांच्या निवासासाठी चर्चमधील सभागृहात व्यवस्था होती.

पाकिटमारीच्या किमान साठ तक्रारी

पोलिसांचा कडक बंदोबस्त असतानाही अडीच लाखांची पाकिटमारी या यात्रेत झाली. यात्रा संयोजकांकडे पाकिटमारीच्या किमान साठ तक्रारी आल्या. पाकिटे चोरीस गेल्याने देशभरातून आलेल्या या भाविकांना घरी जायचे कसा? असा प्रश्न पडला होता.

दरम्यान, पोलिस आयुक्तांनी दोन दिवस नाशिक-पुणे महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे लेखी आदेश दिलेले असतानाही चोवीस तास वाहतूक सुरु होती. वृद्ध, बालके आणि महिला भाविकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागला. मध्य रात्रीपर्यंत वाहतूक खोळंबल्याने वाहन चालकांचेही हाल झाले.

ख्रिस्ती शरीर संस्कार

कॅथॉलिक ख्रिस्ती लोकांच्या मिस्सा बलियन प्रार्थनेदरम्यान कॅथॉलिक ख्रिस्ती भाविकांना एक सफेद रंगाचा गोल आकाराचा वेफरसारखा पदार्थ दिला जातो.

या विधीला ख्रिस्ती शरीर संस्कार म्हटले जाते व कॅथॉलिक खिस्ती ते मोठ्या भक्तिभावाने व आदराने स्वीकार करतात. या पदार्थाला ख्रिस्ती शरीर किंवा होली कम्युनियन म्हटले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT