नाशिक : राज्यात अनेक जिल्ह्यांत पूरस्थितीमुळे (Flood) शंभराहून अधिक मृत्यू झालेले असताना राज्यात मात्र अवघ्या दोनच मंत्र्यांचे सरकार आहे. हे सरकार कॅबिनेट मंत्रिमंडळ बनवू शकत नाही की, इतर मंत्र्यांना शपथ देऊ शकत नाही.
सत्ताधाऱ्यांकडून विरोधी पक्षाचा आवाज दडपण्याचे काम सुरू आहे. सामन्यांमध्ये या सरकारविषयी प्रचंड नाराजी आहे, असा दावा काँग्रेसचे नेते आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केला. (Balasaheb Thorat statement on maharashtra politics Latest Marathi News)
प्रदेश काँग्रेसतर्फे गुरुवारी (ता. २१) राज्यात केंद्र सरकार विरोधात धरणे धरले. नाशिक येथे श्री. थोरात यांच्या नेतृत्वाखाली उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेस पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ‘ईडी’ने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे.
त्यामुळे ‘ईडी’विरोधात काँग्रेसने राज्यभर आंदोलन केले. श्री. थोरात म्हणाले, की नॅशनल हेरॉल्ड स्वातंत्र्यलढ्यातील अशा प्रकारचे वृत्तपत्र आहे की ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिले आहे. विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यसाठी भाजप ‘ईडी’, सीबीआयच्या मदतीने क्रूरपणे विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्रास दिला जात आहे.
सत्ताधाऱ्यांकडून विरोधी पक्षाचा आवाज दडपण्याचे काम सुरू आहे. एका बाजूला प्रचंड महागाई वाढलेली असून, यात सर्वसामान्य व्यक्तीचे जीवन जगणे कठीण झाले आहे. पेट्रोल, डिझेल वाढले, गॅस वाढला आता, तर जीवनावश्यक वस्तूलासुद्धा ‘जीएसटी’ लावला.
दुधाच्या पदार्थांना जीएसटी लावून केंद्र सरकार सामान्यांच्या खिशातून पैसा काढून घेत आहे. महाविकास आघाडी सरकारने ओबीसीची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी नियोजन केले. बांठिया आयोग नेमून अहवाल तयार केला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने योग्य निकाल दिला. ओबीसीच्या हिताचा निर्णय दिला आहे. याचे क्रेडिट महाविकास आघाडीला असून, भुजबळांच्या चळवळीला त्याचे श्रेय द्यायला हवे, असाही दावा त्यांनी केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.