Balasaheb Zanje participated in the marathon competition esakal
नाशिक

Nashik : 8 वर्षांत 25 Mini Marathon स्पर्धा बाळासाहेब झांजे यांनी केल्या पूर्ण!

सकाळ वृत्तसेवा

सातपूर (जि. नाशिक) : शासनाच्या प्रथम वर्गाच्या अधिकारी पदावर कार्यरत राहूनही गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने उत्तर महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीचे नाशिक विभागाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब झांजे मिनी मॅरेथॉन स्पर्धेतून पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्याचे काम करीत आहेत. (Balasaheb Zanje completed 25 Mini Marathon competitions in 8 years Nashik Latest Marathi News)

खासगी किंवा सरकारी नोकरी करताना कामाचा ताण व जबाबदारीमुळे धकाधकीच्या जीवनात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. परंतु, जिद्द व चिकाटी असली तर या सर्वावर मात करता येते. याबाबत निरोगी आरोग्यासाठी सकाळी धावण्याबरोबर विविध उपयुक्त गोष्टी कशा कराव्यात, याबाबत अधीक्षक अभियंता बाळासाहेब झांजे यांनी आपल्या आरोग्याचा मूलमंत्र सांगितला आहे.

महाड येथील ४ वर्षांच्या सेवेत त्यांनी महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन, भोर, मंडणगड, दापोली, श्रीवर्धन या भागामध्ये पहाटे लवकर उठून सहकाऱ्यांसमवेत ट्रेकिंग तसेच धावण्याचा छंद जोपासला आहे. कोकणातील निसर्गसौंदर्य व पर्यावरण हे अख्ख्या जगात कुठेही मिळू शकत नाही. अशा शब्दात त्यांनी येथील निसर्गसंपदेचे वर्णन केले.

पदोन्नतीने नाशिकला अधीक्षक अभियंता पदावर विराजमान झाल्यानंतर हा उत्साह कमी होईल असे सहकाऱ्यांना वाटत असताना बाळासाहेबांनी मात्र आपली जिद्द व चिकाटीने एक नवा आलेख निर्माण केला. आठ वर्षांपासून त्यांनी सुमारे २५ मिनी मॅरेथॉनमध्ये सहभाग घेऊन पर्यावरण संवर्धानाचा संदेश देत आहेत. तरूणांनी आदर्श घेण्याची गरज आहे. नऊ वर्षांपूर्वी झालेल्या आजारपणामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आरोग्याची काळजी घेण्यासाठी गेल्या आठ वर्षांत २५ मिनी मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केली आहेत.

सराव सुरूच

त्र्यंबक, इगतपुरी, दिंडोरीसह विविध गड किल्ले व ट्रेकिंग पॉइंटवर पताका फडकविलेली आहे. यापूर्वी रायगड, विहिरी, खाडीपट्टा, वाळंज, वरंध, पोलादपूर तालुक्यातील म्हाडगृत, कुडपण, कोंटबी, कापडे, प्रतापगड, महाबळेश्वर, दिवेआगर, श्रीवर्धन, मंडणगड, दापोली या भागात १४ ते २० किलोमीटर धावण्याचा सराव सुरू ठेवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT