Crowd for darshan esakal
नाशिक

Shravan Somvar: बम भोलेच्या गजराने रामतीर्थ दुमदुमले! पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त महादेवाच्या चरणी भाविक लीन

सकाळ वृत्तसेवा

Shravan Somvar : रामतीर्थावरील पुरातन व प्रसिद्ध कपालेश्वर मंदिरात पहिल्या श्रावणी सोमवारी (ता. २१) भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. हर, हर महादेव व बम, बम भोलेच्या गजराने रामतीर्थासह गोदाघाटचा परिसर दुमदुमला होता.

दूध, बेल, बेलफळ, हार फुले व तांदुळाची शुवामुठ अर्पण करून महिला भाविक मनोभावे पूजन करीत होत्या. पानाने दिवसभर भोलेचा अभिषेक सुरू होता.

तर व्रतधारी भाविक रामकुंडात स्नान करून शिव मंदिरात पूजेसाठी जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले. (Bam Bam Bhole alarm shook Ramtirtha occasion of first Shravani Monday devotees crowd nashik)

कपालेश्वर संस्थानतर्फे श्रावण महिन्यात दर्शनासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. शिवपिंडीवर सोमवारी पहाटे अभिषेक, रुद्राभिषेक व पूजाअर्चा करून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.

दुपारी एक वाजता कपालेश्वर शिवपिंडीवर जलाभिषेक करून शृंगार करण्यात आला. दुपारी चार वाजता कपालेश्वर महादेवाची परंपरांगत मार्गावरून चांदीच्या पंचमुखी मुखवट्याची पालखी मिरवणूक काढली.

पानाफुलांची आकर्षक सजावट केलेली पालखी रामतीर्थावर आल्यावर महादेवाच्या मुखवट्याला स्नान घालण्यात आले. त्यानंतर रात्री १० वाजता पालखीचे मंदिरात आगमन झाल्यावर महाआरती करण्यात आली.

दरम्यान, भाविकांकडून सभामंडपातील शिवपिंडीवर दुग्धाभिषेक करून शिवमूठ वाहण्यात येत होती. दुधाचे संकलन करून ते शिवभक्तांना प्रसाद स्वरूपात वाटण्यात येत होते. महिला आणि पुरुषांच्या दर्शनासाठी वेगवेगळ्या रांगा होत्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

विविध मंदिरात दर्शनास गर्दी

पहिल्या श्रावणी सोमवारी भाविकांनी परिसरातील विविध शिव मंदिरात दिवसभर दर्शनासाठी गर्दी केली होती.

गोदाघाटावरील बाणेश्वर महादेव मंदिर, कर्पूरेश्वर महादेव मंदिर, नीलकंठेश्वर मंदिर, नारोशंकर मंदिर, मुक्तेश्वर मंदिर, सिद्ध पाताळेश्वर मंदिर, विश्वेश्वर मंदिर, त्यागेश्वर मंदिर, तारकेश्वर मंदिर, टाळकुटेश्वर मंदिर यासह औरंगाबाद रोडवरील जनार्दनस्वामी आश्रमातील शर्वायेश्वर महादेव मंदिर,

नांदूर गोदा काठावरील निळकंठेश्वर मंदिर, मानेनगरमधील ओंकारेश्वर महादेव मंदिर तसेच आडगाव, मानूर, मेरी, म्हसरूळ, मखमलाबाद आदी ठिकाणी असलेल्या शिव मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती.

चोख बंदोबस्त

रामकुंडाच्या दिशेने येणारे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. मालेगाव स्टॅन्ड, इंद्रकुंड, खांदवे सभागृह, सरदार चौक आदी मार्गावर पोलिसांनी बॅरिकेड्स लावून मार्ग वाहनांना बंद करण्यात आले होते.

दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: मोदींचा मेमरी लॉस... राहुल गांधींनी अमेरिकेच्या माजी अध्यक्षांचा किस्सा सांगत केली तुलना, अमरावतीत फटकेबाजी

Parenting Tips: पालकांच्या 'या' चांगल्या सवयींमुळे मुले होतात शिस्तबद्ध, तुम्हीही करू शकता फॉलो

Mumbai High Court : १८ वर्षाखालील पत्नीशी संबंधही बलात्काराच, उच्च न्यायालयाचे निरीक्षण

Mumbai: काँग्रेसचा 'मुंबईनामा' अदानींना धक्का? पोस्टरवर सोनिया गांधींच्या जागी बाळासाहेबांचा मोठा फोटो, काय आहे जाहीरनाम्यात ?

Jhansi Fire Incident : फायर अलार्म वाजला असता तर वाचला असता 10 मुलांचा जीव!

SCROLL FOR NEXT