Nashik News : ग्रामीण भागातल्या मुलांना शिक्षणाची गोडी लागावी, पटसंख्या वाढावी यासाठी शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आली आहे. पण नांदगाव तालुक्यात मात्र याच योजनेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे.
नांदगाव तालुक्यातील बाणगाव बुद्रूकला जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पोषण आहारासाठी बुरशी आलेली तूरडाळ, कुजलेला, अळ्या लागलेले वाटाणे, बादड लागलेली मूगडाळ असे धान्य पुरवण्यात आल्याने सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष व पालकांनी संताप व्यक्त केला आहे. (bangaon Budruk school nutrition food poor quality grains nashik news)
शाळेतील विद्यार्थ्यांना शासनामार्फत पुरवण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराचा दर्जा हा अत्यंत निकृष्ट असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शाळांमध्ये अशा प्रकारे निकृष्ट दर्जाचे धान्य पुरवठा करण्याऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्यासह बाणगाव ग्रामस्थांनी केली आहे.
बाणगाव बुद्रूक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थी शिकत आहे. या विद्यार्थ्यांना आहारासाठी अतिशय निकृष्ट दर्जाच्या धान्याचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका पोचणार आहे.
खराब दर्जाच्या धान्य पुरवठामुळे ग्रामस्थांसह पदाधिकारी संतप्त झाले असून अशा प्रकारचे निकृष्ट धान्य पुरवठा करणाऱ्या संबंधित घटकांवर आणि हे धान्य स्वीकारणाऱ्या संस्थेवर कायदेशीर कारवाई करावी, पुरवठा केलेले खराब धान्य परत घेऊन त्वरित दर्जेदार धान्य पुरवठा करण्यात यावा.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
तसेच या प्रकरणी जबाबदार असणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे. यावर तालुका शिक्षण विभागाचे अधिकारी काय भूमिका घेतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे
पोषण आहार वितरण नियमावली
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतंर्गत शाळांना पुरवल्या जाणाऱ्या धान्य मालाची शालेय शिक्षण विभागाच्या भरारी पथकांमार्फत तपासणी बंधनकारक आहे. हे धान्य निकृष्ट दर्जाचे आढळल्यास संबंधित पुरवठादारावर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. कारवाईचे अधिकार प्राथमिक शिक्षण संचालकाकडे आहे.
प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि त्यांचे प्रतिनिधी दर महिन्याला पुरवठादारांच्या गोदामांना भेट देऊन तांदूळ आणि अन्य धान्यांचा दर्जा, साठवणूक, वितरण आणि शिल्लक धान्या बाबतच्या नोंदीची तपासणी करून त्याचा अहवाल शिक्षण संचालनालयास सादर करण्याचे आदेश आहे.
पुरवठादारांनी निकृष्ट धान्य पुरवल्याचे आणि प्रयोगशाळेत तपासणी करून समाधानकारक अहवाल प्राप्त न झाल्यास, धान्याच्या पुरवठय़ात गैरप्रकार केल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करण्यात येईल. त्यात फौजदारी गुन्हा दाखल करणे, पुरवठा करार रद्द करणे, पुरवठादाराला काळय़ा यादीत टाकणे आदी कारवाई करण्याचे अधिकार प्राथमिक शिक्षण संचालकांकडे सोपवण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.