Bank customers standing in wait as bank operations are stopped esakal
नाशिक

वीज पुरवठा खंडितचा बँकांना शॉक; वीजेअभावी कामकाज ठप्प

अमोल खरे

मनमाड (जि. नाशिक) : काल रात्रीपासून वीज पुरवठा खंडित असल्यामुळे याचा चांगलाच शॉक बँकांनाही बसला. वीज पुरवठा खंडित असल्यामुळे आज दिवसभर बँकांचे कामकाज ठप्प होते. त्यामुळे बँकेत आलेल्या बँक ग्राहकांना कामाआभावीच परतावे लागल्याने मनस्ताप सहन करावा लागला. (Banks shocked as power supply interrupted from last night Nashik Latest Marathi News)

गेल्या तीन दिवसांपासून मनमाड शहरात विजेचा लपंडाव सुरू आहे. वीज पुरवठा खंडित असल्यामुळे अनेकांचे कामे खोळंबली आहे. तर वीज वितरण कंपनीच्या अधिकारी, कर्मचारी काय करतात असा सवाल उपस्थित केला जात आहे. काल रात्री वीज पुरवठा खंडित झाला. तो संबंध रात्रभर खंडीतच होता, तर सकाळीही वीज पुरवठा पूर्ववत झालेला नव्हता. विशेष म्हणजे गणेशोत्सव सुरू असल्याने गणेश मंडळांची मोठी अडचण निर्माण झाली होती.

तर घरात वीज नसल्याने नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. रात्रभर वीज नसल्याने इन्व्हर्टर मधील वीज संपली होती, तर आजही काही वेळ आलेली वीज वारंवार पुन्हा खंडित झाल्यामुळे वीज पुरवठा सुरळीत होत नव्हता. वीज नसल्याचा मोठा फटका बँकांना बसला आहे. बँकेतील इन्व्हटर चार्ज होऊ शकले नाही, तर वीज पुरवठा नसल्यामुळे सर्व्हर डाऊन होते. सुमारे २० ते २२ तासापासून वीज नाही जणू काही वीज नसल्याचा शॉकच बँकांना बसला होता. बँका उघड्या होत्या, अधिकारी, कर्मचारी आलेले होते, मात्र विजे अभावी त्यांना काम करता येत नव्हते.

बँकांचे कामे ठप्प झाली होती. त्यामुळे पैसे काढण्यासाठी, जमा करण्यासाठी तसेच इतर कागदपत्रांची कामे करण्यासाठी आलेल्या बँक ग्राहकांनाही चांगलाच शॉक बसला. बँकेत येऊनही काम न झाल्यामुळे मोठा मनस्ताप बँक ग्राहकांना झाला, तर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे फोन बंद असल्याने नागरिकांमध्ये अधिकच चीड निर्माण झाली आहे

"गेल्या दोन दिवसापासून वीज पुरवठा खंडित असल्यामुळे त्याचा मोठा फटका राष्ट्रीयकृत बँकांना बसला. बँकांच्या कामकाजाची संगणकीय प्रणाली पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे बँक ग्राहकांना बँकसेवा मिळाली नाही. जेष्ठ नागरिक, महिला, व्यापारी यांना जास्त त्रास झाला. वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी फोन बंद करून ठेवले. अधिकारी देखील विजे प्रमाणे गायब झाले.याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यास कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो." - नितिन पांडे, जिल्हा उपाध्यक्ष, भाजपा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Puja Khedkar: पूजा खेडकर प्रकरणात आज निर्णय; अटक होणार की पुन्हा संरक्षण मिळणार?

Share Market Opening: फेडच्या निर्णयामुळे शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; निफ्टी 100हून अधिक अंकांनी खाली, कोणते शेअर्स वधारले?

Mohammad Nabi: अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबी घेणार निवृत्ती, 'ही' टूर्नामेंट असेल शेवटची

Chhagan Bhujbal: 'ईडीपासून मुक्ती मिळावी, यासाठी भाजपसोबत गेलो' भुजबळांचा खुलासा; राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात दावा

Share Market Today: फेडच्या व्याजदर कपातीचा शेअर बाजारावर काय परिणाम होणार? आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

SCROLL FOR NEXT