Illumination of Shri Khanderao Maharaj Temple in the background of Champashashti. In the second photo, the idols of Shri Khanderao Maharaj, Mhalsa Devi and Banai in the temple esakal
नाशिक

Champashashthi 2023: चंपाषष्ठीसाठी बानूबाईची चंदनपुरी सजली! श्री खंडेराव महाराजांच्या मंदिरावर रोषणाई

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : चंपाषष्ठीच्या निमित्ताने बानूबाईची चंदनपुरी मल्हारभक्तांच्या स्वागतासाठी सजली आहे. श्री खंडेराव महाराजांच्या मंदिरावर रोषणाई करण्यात आली आहे.

जय मल्हार ट्रस्ट आणि ग्रामपंचायतीतर्फे भाविकांना विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. देवाला भरीत-भाकरीचा नैवेद्य दाखविला जाणार आहे.

चंपाषष्ठीनिमित्त श्री खंडेरायांच्या शड नवरात्रोत्सव सुरू असून सोमवारी (ता. १८) घट विसर्जन केले जाणार आहे. दरम्यान, उत्सवाच्या पूर्वसंध्येला रविवारी (ता. १७) तालुक्यासह कसमादेतील वाघ्या-मुरळी चंदनपुरीत दाखल झाले आहेत. (Banubai Chandanpuri lighten up for Champashashthi Illumination at temple of Shri Khanderao Maharaj nashik)

श्री. खंडेराव महाराज महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. खंडेराव महाराजांचे बारा वर्षे चंदनपुरीत बानूबाईच्या घरी वास्तव्य होते, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे जेजुरीनंतर चंदनपुरीला मोठे महत्त्व आहे.

मंदिरात श्री खंडेराव महाराज, म्हाळसा देवी व बानाईची मूर्ती आहे. इथे चंपाषष्ठी उत्साहात साजरी केली जाते. चंदनपुरीत पौष पौर्णिमेला १५ दिवसांचा यात्रोत्सव होतो.

चंपाषष्ठीनिमित्त मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला असून केळीच्या पानांनी सजविण्यात आला आहे. सोमवारी (ता. १८) सकाळी देवाची अभिषेक पूजा होऊन आरती होईल.

शक्तीदेवीचा शारदीय नवरात्रोत्सव साजरा केला जातो. तशाच पद्धतीने श्री खंडेरायाचा सहादिवसीय शड नवरात्रोत्सव साजरा होतो.

देवदीपावलीला देवाच्या मूर्तीजवळ घटस्थापना केली जाते. ६ दिवसांत आरोग्य व सुख-समृद्धीसाठी देवाला प्रार्थना करून मल्हारी सप्तशतीच्या १४ पाठांचे वाचन केले जाते. या काळात प्रामुख्याने पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपवास करतात.

चंपाषष्ठीला घट विसर्जन करून उपवास सोडले जातात. श्री खंडेराव महाराजांनी मणी व मल्ल या राक्षसांचा वध केला. लढाईत देव थकल्यामुळे घटी बसतात, अशी आख्यायिका आहे. या काळात विविध धार्मिक कार्यक्रम केले जातात.

भरीत वांग्याचा भाव किलोला ६० रुपये

चंपाषष्ठीला वाघ्या-मुरळींकडून देवाची तळी भरली जाते. त्या साठी हजारो कुटुंबीय चंदनपुरीत येतात. अनेक श्रद्धाळू भरीत-भाकरीचा प्रसाद वाटप करणार आहेत. चंपाषष्ठीच्या अनुषंगाने बाजारात भरीतच्या वांग्यांना मागणी होती.

वांगे ५० ते ६० रुपये किलो या भावाने विकले जात होते. चंपाषष्ठीला मल्हारभक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन दर्शनरांगेत व मंदिरात स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

किल्ला पोलिस बंदोबस्त ठेवणार आहेत. वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी शालिमार हॉटेल ते चंदनपुरीपर्यंत वाहतूक पोलिस नियुक्त केले जाणार आहेत.

"चंपाषष्ठीच्या पार्श्‍वभूमीवर भाविकांना पिण्याच्या पाण्यासह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नारळ फोडण्यासाठी यंत्राची व्यवस्था आहे. मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. श्रध्दाळूंना सुरळीत दर्शनासाठी मदत व्हावी, यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाविकांनी दर्शनासाठी जाताना आपले दागिने व मौल्यवान वस्तू ट्रस्टच्या कार्यालयात जमा करून रीतसर पावती घ्यावी. दर्शन झाल्यानंतर पावती दाखवून आपल्या वस्तू घेऊन जाव्यात. भुरट्या चोरांपासून सावधानता बाळगावी."

- सतीश पाटील, अध्यक्ष, जय मल्हार ट्रस्ट, चंदनपुरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT