fake post esakal
नाशिक

सावधान ! अफवा पसरविल्यास कडक कारवाई

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी (जि. नाशिक) : वर्षभरापूर्वी पालघर आणि गेल्या आठवड्यात सांगली जिल्ह्यात अविचाराने पसरवलेल्या अफवांमुळे संतापजनक घटना घडून अनर्थ झाला आहे. त्याची पुनरावृत्ती शहरांतही घडू नये म्हणून शहर पोलिस सतर्क झाले असून निराधार अफवा पसरू नयेत. अन्यथा संबंधितावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे. (Be careful Boys girls being abducted in city rumours viral message on social media police take action Nashik News)

पंचवटी परिसरातील कोणार्कनगर भागातील ६ लहान मुलांचे अपहरण झाले असून आपल्या मुलांना एकटे घराबाहेर सोडू नका असा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसाच एक मेसेज वडाळा परिसराचा उल्लेख करून व्हायरल केला जात असल्याने शहरात भीतियुक्त खळबळ उडाली आहे.

वास्तवतेचा विपर्यास करणाऱ्या अशा मेसेजमधून समाजात पसरणारी भीती प्रसंगी कुठलेही बेकायदेशीर कृत्य करण्यास धजावते त्यातून मॉब लिंचिंग सारखे प्रकार घडू शकतात. यामुळे नाशिक शहर पोलिस सतर्क झाले असून, अफवा पसरविणाऱ्या घटकावर नजर ठेवून आहेत.

विविध व्हॉट्स ॲप ग्रुप, फेसबुकवर मुलांच्या अपहरणाच्या फिरत असलेल्या मेसेजबाबत आडगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार असा कोणताही प्रकार पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेला नसून कोणत्याही प्रकारचा गुन्हा आतापर्यंत दाखल झाला नसल्याचे सांगण्यात आले आहे.

"कृपया मेसेज फॉरवर्ड करताना सत्यता तपासून घ्यावी. अपहरणाची कोणतीही घटना कोणार्क नगरसह पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेली नसून तशा स्वरूपाचा कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही." - इरफान शेख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक- आडगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT