नाशिक : ब्युटीपार्लर व्यवसायातील तेजी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तसेच, सध्या लग्नसराईमुळेही पार्लरमध्ये महिलांचे जाण्याचे प्रमाण वाढले असतानाच, स्पेशल वेडिंग ऑफर्समुळे ब्युटीपार्लरचा व्यवसाय तेजीत आहे. शहरात अधिकाधिक फॅशनेबल पार्लरची संख्याही अधिक आहे. तसेच सोसायट्यांमध्येही घरगुती पार्लरची संख्या लक्षणीय आहे. गेल्या काही वर्षांपासून ब्युटीपार्लर व्यवसायाचे स्वरूप बदलत आहे. तरुणाईची वाढती क्रेझ लक्षात तो फायदेशीर व्यवसाय म्हणून नावारूपाला येत आहे. (Beauty Parlor Business Good Day Due to wedding season Boom after Corona Nashik Latest Marathi News)
दोन वर्षे कोरोनामुळे सारेच व्यवसाय बंद होते. त्यामुळे लहान- मोठे लघुउद्योग, घरगुती व्यवसायाला मरणकळा आल्या होत्या. त्यातून अलीकडे काही व्यवसाय उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरीही सर्वत्र उद्योग, व्यवसायांत मंदीचे सावट असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. त्याचा फटका त्याला पूरक व्यवसायांनाही बसत आहे. मात्र, याउलट परिस्थिती ब्युटीपार्लर व्यवसायात पाहायला मिळते. सध्या महिला आणि तरुणांमध्ये सौंदर्य अधिक खुलविण्याचे क्रेझ आहे.
विशेषत: सध्या लग्नसराई सुरू आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर निर्बंधमुक्त लग्न कार्य सुरू आहेत. त्यामुळे लग्नसराईवर अवलंबून असलेल्या बहुतेक व्यवसायांना तेजी आली आहे. मंगल कार्यालये, लॉन्स वऱ्हाडी मंडळींमुळे ओसंडून वाहत आहेत. तसेच, पुन्हा सनई- चौघडे वाजू लागले आहेत. डीजेच्या तालावर तरुणाई थिरकते आहे. तर, महिलांचे मुख्य आकर्षण असलेले ब्युटीपार्लर व्यवसायातही तेजी आहे.
रोजगाराची संधी
ब्युटीपार्लर व्यवसायातून महिलांना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. विशेषत: व्यावसायिक स्वरुपाने याकडे पाहिले तर यातून महिलांना मोठ्या प्रमाणात अर्थार्जन मिळू शकते. तर अलीकडे घरगुती व्यवसाय म्हणून याकडे पाहिले जाते. अगदी हेअर कटिंग, आयब्रोज, फेशियल यासारख्या सुविधा घरगुती ब्युटीपार्लरच्या माध्यमातून करता येतात. त्यातूनच चांगले अर्थार्जन महिलांना उपलब्ध होते.
लग्नसराईतील मेकअप
ब्लीच, फेसियल, मेडिक्युअर, पेडीक्युअर, व्हॅक्स, हेअर स्टाइल, आयब्रोज, दुल्हन मेकअप. मेकअपनुसार दर : सर्वसाधारणत: एखाद्या कार्यक्रमाच्या मेकअपसाठी पाच ते आठ हजार रुपये मोजावे लागतात. तर स्पेशल दुल्हन मेकअपसाठी १५ ते २५ हजार रुपये आकारले जातात. लग्नसराईमुळे दुल्हन मेकअपसह मेहेंदीचाही समावेश केला जातो. याशिवाय, नित्याची मेकअपबाबत वेगवेगळे दर असतात.
"महिलांना मेकअप करणे आवडते. चांगले सौंदर्यप्रसाधने वापरून उत्तम सेवा महिलांना आवडते. सध्या लग्नसराई असल्यामुळे नवरी मुलीसाठी विविध प्रकारचे मेकअप केले जातात. त्यासाठी विशेष पॅकेजेस आहेत. महिलांसाठी ब्युटी पार्लर रोजगाराच्या दृष्टीने सर्वोत्तम पर्याय आहे." - तेजस्विनी पवार, तेजू ब्युटीक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.