Bytco Hospital 
नाशिक

चमत्कारच हा! 'हे' रुग्णालय रुग्णांसाठी ठरतंय आरोग्य मंदिर अन् देवदूतच!

हर्षवर्धन बोऱ्हाडे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक/ नाशिक रोड : इथल्या आरोग्य सेवेतील कर्मचारी व सफाई कामगारांना नागरिक सध्या देवदूतच मानत आहे. कोरोनाला हरविण्यासाठी वैद्यकीय पथक सध्या जीव ओतून काम करीत आहे. असा कोणता चमत्कार इथे घडत आहे? की या रुग्णालयात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे.

कोरोनाला हरविण्यासाठी जीव ओतून काम

बिटकोची नवीन इमारत अनेक वर्षांपासून धूळ खात पडून होती. ठेकेदाराच्या हलगर्जीमुळे महापालिकेच्या दुर्लक्षामुळे या इमारतीत रुग्णालय स्थलांतरित झालेले नव्हते. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामु‍ळे रुग्णालयात खासगी रुग्णालयापेक्षा गुणवत्तापूर्ण सेवा मिळत आहे. विशेष करून झोपडपट्टीतील नागरिकांबरोबरच उच्च मध्यमवर्गीयही बिटकोत सेवा घेत आहेत. डॉ. जितेंद्र धनेश्वर व त्यांच्या पथकाचे कौतुक होत असून आरोग्य सेवेतील कर्मचारी व सफाई कामगारांना नाशिक रोडकर सध्या देवदूतच मानत आहे. कोरोनाला हरविण्यासाठी वैद्यकीय पथक सध्या जीव ओतून काम करीत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या बिटको रुग्णालयाची नवीन इमारत नाशिक रोडकरांना सध्या आरोग्य मंदिर ठरू लागली आहे. ३०० खाटांची क्षमता असणाऱ्या या रुग्णालयात ३६ कर्मचाऱ्यांद्वारे १८५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाचे समाधान होईल, यादृष्टीने आम्ही सेवा देत आहोत. यासाठी २४ तास काम करतो. स्वच्छता व गुणवत्ता या गोष्टींकडे लक्ष दिल्याने बिटकोला नागरिकांची पसंती मिळत आहे.- जितेंद्र धनेश्वर, वैद्यकीय अधिकारी

खासगी रुग्णालयापेक्षा चांगली आरोग्यसेवा मिळत असल्याने रुग्णालयात प्रवेश घेणे आत्मविश्वासाचे वाटते. कमी कर्मचाऱ्यांमध्ये येथील वैद्यकीय पथक दर्जात्मक सेवा लोकांना देत आहे.- शरद मोरे, नगरसेवक

गरिबांना मोफत उपचार मिळत असल्याने बिटको रुग्णालय आरोग्य रक्षणाचे केंद्र झाले आहे. येथील डॉक्टर चांगल्या सेवा देत असल्याने खासगी रुग्णालयापेक्षाही उच्चप्रतीची आरोग्यसेवा मिळत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही या रुग्णालयात अधिक आहे.- संभाजी मोरुस्कर, नगरसेवक

रिपोर्टर - हर्षवर्धन बोऱ्हाडे

(संपादन - ज्योती देवरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar यांच्यावर टीका का करत नाही? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मी विचलित...'

Latest Maharashtra News Updates : पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Sovereign Gold Bond: सरकारी योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट

Maratha Reservation: सरकारमुळेच माझ्या मुलाचा जीव गेला; आरक्षणासाठी जीव देणाऱ्या प्रतिकच्या आईचा जरांगेंसमोर टाहो

A Unique Hat trick: ऑस्ट्रेलियन फिरकीपटूची अनोखी हॅटट्रिक; ३६ वर्षांपूर्वी कर्टनी वॉल्श यांनी केली होती अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT