Cyber crime esakal
नाशिक

Nashik Cyber Crime: ऑनलाइन आमिषांपासून सावधान! सायबर भामट्यांनी नाशिककरांना घातला अडीच कोटींचा गंडा

नरेश हाळणोर

Nashik Cyber Crime : कधी पार्टटाइम जॉब तर, कधी सोशल मीडियावरील जाहिरातींना फक्त ‘लाईक’ करण्याच्या माध्यमातून जादा कमाई करण्याचे आमिष दाखवून गंडा घालणे, तर कधी लॉटरी, सोशल मीडिया, पॉलिसी, ओटीपी, मोबाईल हॅक करून बँक खात्यातून परस्पर ऑनलाइन गंडा घालणाऱ्या सायबर भामट्यांनी नाशिककरांना गेल्या २१ महिन्यांमध्ये तब्बल अडीच कोटींची फसवणूक केली आहे.

सध्या सणासुदीचा काळ असून, त्याचा गैरफायदाही सायबर भामट्यांकडून घेतला जात असून, कोणत्याही आमिषांना बळी न पडता फसवणूक टाळण्याचे आव्हान नाशिककरांसमोर आहे. (Beware of Online Lures Cyber ​​criminals cheated Nashikkars worth two hald crores)

नाशिक सायबर पोलिस ठाण्यात दररोज ऑनलाइन सायबर भामट्यांकडून फसवणूक झाल्याच्या तक्रारी घेऊन तक्रारदार येत आहेत. यामध्ये बहुतांशी फसवणूक ही सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाइन जॉबच्या आमिषाला बळी पडल्याने झालेली असते.

तर काही तक्रारी मोबाईलवरून आर्थिक व्यवहार करताना हॅकिंगमुळे फसवणुकीच्या असतात. अलीकडे सहजरीत्या कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून गंडा घातल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत.

गेल्या २१ महिन्यांमध्ये नाशिककरांची सायबर भामट्यांनी दोन कोटी ५२ लाख ८४ हजारांची फसवणूक केली आहे. नाशिक सायबर पोलिसांना या काळातील दाखल गुन्ह्यांपैकी सुमारे ५० लाखांची रक्कम परत आणण्यात यश आलेले आहे.

२०२२ मध्ये ऑनलाइन फसवणुकीचे २६ गुन्हे दाखल आहेत, तर गेल्या नऊ महिन्यांमध्ये ४८ सायबर फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.

ऑनलाइन फ्रॉड

फ्रॉडचे प्रकार ................... गुन्हे

- ओएलएक्स ....... एक

- लोन ॲप ...........चार

- क्रेडिट/डेबिट कार्ड .........सहा

- ओटीपी/केवायसी........दोन

- ऑनलाइन जॉब........२५

- लॉटरी.......चार

- एमएससीबी......दोन

- पॉलिसी ........पाच

- शेअर मार्केट....दोन

- ई-मेल हॅक.........दोन

- रॉलेट .......एक

- क्रिप्टो करन्सी ....एक

- ऑनलाइन फ्रॉड (आमिष) ........६५

सोशल मीडिया फ्रॉड

- इन्स्ट्राग्राम - ९०

- फेसबुक - ७०

- व्हॉट्‍सॲप - १३

- वेबसाइट - सात

- फ्रॉड कॉल्स - सहा

- टेलिग्राम - आठ

...अशी घ्या काळजी

- बॅंकेचा अधिकारी असल्याचा बतावणी करणारा फोन आल्यास त्यास प्रतिसाद देऊ नये.

- फोनवरून कोणीही ओटीपी क्रमांकाची मागणी केल्यास तो देऊ नये.

- व्यक्तिगत माहिती सोशल मीडियावर सार्वजनिक करू नये.

- ऑनलाइन फसवणूक झाल्यास त्याची माहिती १९३० वा १५५२६० ला द्यावी.

- फसवणुकीचा संपूर्ण तपशील नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर (https://cybercrime.gov.in) २४ तासांच्या आत द्यावा.

- मोबाईल वा ई-मेलला आलेल्या अनोळखी लिंक ओपन करू नये.

- ऑनलाइन जॉबच्या आमिषाला बळी पडू नये

"ऑनलाइन जॉब वा व्यवहार करताना दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे. ऑनलाइन फसवणूक झाल्यास तत्काळ सायबर क्राइमच्या पोर्टलवर वा १९३० या क्रमांकावर तक्रार नोंदवावी. अनोळखी लिंक वा मेसेजला रिप्लाय देणे टाळले तर फसवणूक टाळता येऊ शकते."

- प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreyas Iyer IPL Mega Auction 2025 : श्रेयस अय्यर आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला, PBKS ने मोजली तगडी रक्कम

Maharashtra Election Result 2024: विरोधकांचे उरले-सुरले आमदारही सत्तापक्षाच्या संपर्कात; आणखी दोन पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू! श्रेयस अय्यवर तब्बल २६ कोटी ७५ लाखांची बोली

Amalner Assembly Election 2024 Result : अमळनेरला मंत्री अनिल पाटलांची बाजी; 33 हजार 445 मतांचे मताधिक्य

तीनही पोटनिवडणुकीत काँग्रेसची बाजी; भाजप-धजद युतीला धक्का, माजी मुख्यमंत्र्यांचे दोन पुत्र पराभूत

SCROLL FOR NEXT