Theft  esakal
नाशिक

सावधान! दिवाळीत परगावी जाताना घ्या खबरदारी

दिपक आहिरे

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : महिन्याभरात एकाच भागात भरदिवसा पाच घरफोड्या करून विक्रम साधणाऱ्या चोरट्यांपासून पिंपळगावकरांनी सावध राहण्याची गरज आहे. दिवाळी ही चोरट्यांसाठी पर्वणी ठरू शकते. बेफिकीर, बेसावध नागरिकांचे दिवाळे काढू शकते. दिवाळीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्यांनी याची खरबदारी अधिक घेण्याची गरज आहे. पिंपळगांवकरांनो सावधान, बंद दारावर चोरट्यांचा डोळा आहे. तक्रार नोंदवून घेण्यास नाक मुरडणाऱ्या पिंपळगाव पोलिस प्रशासनाच्या भरवशावर असाल तर तुमची फसगत होईल अशी स्थिती आहे.

तुमची दिवाळी ठरू शकते चोरट्यांसाठी पर्वणी

दिवाळी सणाला सुरवात झाली असून अनेक नागरिक सणानिमित्त, सुट्यामुळे बाहेरगावी किवा पर्यटनाला जाण्याचा बेत आखत आहे. उंबऱखेड रस्त्यावरील घरफोडीचे सत्र पाहता पिंपळगावकरांनी पुढच्यास ढेच, मागचा शहाणा..म्हणत यातून बोध घेण्याची गरज आहे. भरदिवसाचा कांदा अडतदारांच्या रोखपालाकडून दहा लाखांच्या लुटमारीने तर पिंपळगाव हादरले होते. योग्य खबरदारी न घेतल्यास चोरही हात धुवून घेतात हा अनुभव आहे. बाहेरगावहून आल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात येईल. पुढे पोलिस ठाण्यात गेल्यावर पश्‍चातापा शिवाय हाती काहीच लागणार नाही.कारण चोर सापडले तर न्यायालयातुन मुद्दे माल घ्यावा लागेल असा धाक पोलीसांकडुन दाखविला जातो.तक्रार घ्यायलाच चार-पाच दिवस लागतात. त्यामुळे हे प्रकार टाळण्यासाठी नाहगरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.बाहेरगावी जातांना मौल्यवान वस्तु,पैसे,घरात ठेवण्याऐवजी बॅकेत ठेवले तर चोरी झालीच तर चोरटे रिकामे हाती परततील.

कोरोनाच्या संकटातनंतर आता व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. त्यात दिवाळी सण सुरू आहे. बाजारपेठेतही गर्दी आहे, अनेक जण बाहेरगावी जाणार हे लक्षात घेऊन पोलिसांनी देखील गस्त वाढवण्याची गरज आहे.

अशी घ्यावी काळजी....

* बाहेरगावी जाताना शेजारी व वॉचमनला माहिती द्यावी.

* घरात अनोळखी व्यक्तीला प्रवेश देऊ नये.

* नागरिकांनी आपल्या मौल्यवान वस्तू बॅकेच्या लॉकरमध्ये ठेवाव्यात.

* बॅकेत जाताना मोठी रक्कम आणायची असेल तर एखादी व्यक्ती सोबत असावी.

* बॅकेतून रक्कम भरताना व काढताना सतर्कता बाळगावी.

* संशयित हालचाल दिसून आल्यास पोलिस ठाण्याला माहिती द्यावी.

''पिंपळगाव शहरातील चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिस प्रशासन सतर्क आहे. नागरिकांनी बाहेरगावी जाताना मौल्यवान वस्तू, रोख रक्कम घरात न ठेवता बॅकेत ठेवावी.'' - भाऊसाहेब पटारे, पोलिस निरीक्षक, पिंपळगाव बसवंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Maharashtra Assembly 2024 Result : फडणवीस की पटोले; ठाकरे की शिंदे; काका की पुतण्या? इथे पाहा सर्वांत वेगवान आणि अचूक निकाल LIVE Video

SCROLL FOR NEXT