BFW investment in The Purchase House nashik sakal
नाशिक

‘द पर्चेस हाऊस’मध्ये ‘बीएफडब्ल्यू’ची गुंतवणूक ; स्‍टार्टअपला बळकटी

नाशिक : स्‍टार्टअपला बळकटी; औद्योगिक समस्‍येवर उपाय ठरतोय प्रभावी

अरुण मलाणी

नाशिक : वर्षानुवर्षे पडून असलेल्‍या औद्योगिक सामग्रीची सुलभ खरेदी-विक्री घडवत नाशिकचे स्‍टार्टअप ‘द पर्चेस हाऊस’ कंपन्‍यांची समस्‍या सोडवत आहे. सध्या साडेतीनशे कोटींची सामग्री स्‍टार्टअपच्‍या पोर्टलवर नोंदविलेल्‍या असून, राष्ट्रीय स्‍तरावर व्‍यवहारदेखील होत आहेत. या क्षेत्राचा विस्‍तार बघता उत्‍पादन क्षेत्रातील आघाडीची कंपनी भारत फ्रिट्‌झ वर्नर लिमिटेड (बीएफडब्‍ल्‍यू) यांनी ‘द पर्चेस हाऊस’ स्‍टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. सोबतच व्‍यवहारांसाठी व्‍यापक दालन खुले झाले आहे.

औद्योगिक कंपन्‍यांना आपल्‍या उत्‍पादनासाठी कच्चामाल, मशिनसह अन्‍य सामग्रीची आवश्‍यकता असते. परंतु अनेक वेळा ही सामग्री अतिरिक्‍त ठरल्‍याने कारखान्‍यात पडून राहाते. काही ठिकाणी प्‍लांट किंवा प्‍लॉटही पडून असतो. यामुळे पैसे तर अडकतातच, सोबत सामग्री सांभाळण्यासाठी जागाही लागते. या समस्‍येवर तोडगा शोधताना नाशिकचे स्‍टार्टअप असलेल्‍या ‘द पर्चेस हाऊस’ यांनी पोर्टलद्वारे या सामग्रीची विक्री व खरेदीसाठी सुविधा उपलब्‍ध करून दिली आहे. यामुळे देशाच्‍या कुठल्‍याही कानाकोपऱ्यात असलेल्‍या कंपनीला त्‍यांना आवश्‍यक सामग्री वाजवी दरात खरेदी करणे शक्‍य झाले आहे. दुसरीकडे पडीक असलेल्‍या सामग्रीतून विक्रीदार कंपन्‍यांचे पैसे व जागा मोकळी होण्यास मदत होते आहे.

कोरोनाकाळात कंपन्‍यांची चणचण दूर करण्यास मदत

कोरोनाकाळात लॉकडाउन व अन्‍य विविध कारणांमुळे अनेक कंपन्‍या आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडल्‍या होत्‍या. अशा पडतीच्‍या काळात ‘द पर्चेस हाऊस’च्‍या माध्यमातून अडगळीत पडलेल्‍या वस्‍तूंची विक्री करत कंपन्‍यांना रोकड (कॅश फ्लो) सुरळीत करण्यास सहाय्यता झाली. दुसरीकडे खरेदीदार कंपन्‍यांना सवलतीच्‍या दरात सामग्री उपलब्‍ध झाल्‍याने त्‍यांच्‍या खर्चात बचत होण्यास मदत झाली आहे.

देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणांहून व्‍यवहार घडविण्यातही ‘द पर्चेस हाऊस’च्‍या टीमला यश आले आहे.

‘बीएफडब्‍ल्यू’मुळे विस्‍ताराची संधी

बेंगळुरूला मुख्यालय असलेल्‍या उत्‍पादन क्षेत्रातील आघाडीच्‍या भारत फ्रिट्‌झ वर्नर लिमिटेड यांनी ‘द पर्चेस हाऊस’ मध्ये गुंतवणूक (स्ट्रॅटेजिक इनवेस्‍टमेंट) केल्‍याने संधींचा विस्‍तार होणार आहे. साठ वर्षांचा अनुभव असलेल्या बीएफडब्‍ल्‍यूतर्फे कोअर मशिन उत्‍पादनासोबत रोबोटिक्‍स, आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. मनुष्यबळ, मार्केटिंगमध्येही कंपनीने आघाडी घेतली असून, या प्रदीर्घ अनुभव व विस्‍ताराचा ‘द पर्चेस हाऊस’ला फायदा होणार आहे.

या क्षेत्राची राष्ट्रीय पातळीवरील व्‍याप्ती सुमारे तीस हजार कोटींची असल्‍याचा अंदाज आहे. कंपन्‍यांमधील अतिरिक्‍त सामग्री अर्थव्‍यवस्‍थेसोबत पर्यावरणासाठी मारक ठरू शकते. या समस्‍येवर चार वर्षांहून अधिक कालावधीपासून उपाय सुचविताना प्रतिसाद वाढत आहे. कोअर मशिनरी उत्‍पादनातील आघाडीच्‍या ‘बीएफडब्ल्यू’तर्फे गुंतवणूक केल्‍याने कामाची कक्षा आणखी वृद्धिंगत होण्यास मदत होईल.

-ऋषिकेश भंडारी, सहसंस्‍थापक, द पर्चेस हाऊस

पारदर्शक व्‍यवहारामुळे देशभरातील कंपन्‍यांमध्ये आमची विश्‍वासार्हता निर्माण झालेली आहे. पोर्टलवर अद्ययावत माहिती दिली जात असल्‍याने उपलब्‍धतेची हमी मिळते. आमचा चमू तांत्रिकदृष्ट्या सुसज्‍ज असून, ग्राहकांसाठी पाहणी (इन्‍पेक्‍शन), तांत्रिक माहिती, दळणवळणासह अन्‍य सुविधा पुरविल्‍या जात आहेत. त्‍यामुळे खर्चात बचत होण्यासह दमछाक टळत दुहेरी फायदा होत आहे.

-कांचन भंडारी, सह-संस्‍थापक, द पर्चेस हाऊस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT