Bhagyesh Jadhav esakal
नाशिक

Success Story: प्रतिकूल परिस्थितीत भाग्येश जाधवची स्पर्धा परिक्षेतून RBI मध्ये निवड

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव शहर (जि. नाशिक) : मालेगाव शहरातील अयोध्यानगर भागात राहणाऱ्या भाग्येश जाधव यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या परीक्षेत प्रतिकूल परिस्थितीत अविश्रांत अभ्यास करत यश संपादन केले. भाग्येश यांची नुकतीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथे फॉरेन करन्सी विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. भाग्येशने स्वतः वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत ‘कमवा व शिका’ ही योजना कृतीतून साकारली. (Bhagyesh Jadhav selected in RBI through competitive examination against adverse circumstances Nashik News)

घरातील आर्थिक परिस्थिती बेताचीच असलेल्या भाग्येश जाधव यांच्या आईवडीलांनी मोलमजुरी करत भाग्येशच्या शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्न केले. आई ज्योती यांनी रात्रंदिवस शिलाई काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला.

दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च करत असताना भाग्येशला आर्थिक व मानसिक पाठबळ दिले. स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या भाग्येश जाधव यांनी आपल्या आईच्या प्रामाणिक कष्टांची जाणीव ठेवत सातत्याने अभ्यास केला. रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश संपादन केले.

देशभरातील लाखो विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील केवळ दोनशे चार विद्यार्थी निवडले गेले. त्यात भाग्येश पहिल्या पाचमध्ये आहे. रिझर्व्ह बँकेच्या फोर्ट मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयात भाग्येश जाधव यास विशेष महत्त्वाच्या ‘परकीय चलन’ विभागात काम करण्याची संधी मिळाली. भाग्येशने शहरातील मसगा महाविद्यालय येथून स्टॅटिस्टिक्समधे बी.एस्सी. पूर्ण केले असून पुण्यातील मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर येथे स्टॅटीस्टीक्समधे एम.एस्सी. केले. ‘राष्ट्रीय सेवा योजना’ ‘कमवा व शिका’ ‘फोटोग्राफी व शूटिंग’ आदी माध्यमातून भाग्येश यांनी स्वतः च्या शिक्षणासाठी आर्थिक स्रोत उभे केले.

विविध बॅंकिंग व स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना भाग्येश यांनी आरबीआयच्या परीक्षेत ग्रेड डी अधिकारी म्हणून मोठे यश संपादन केले आहे. मालेगाव येथील कैलास तिसगे यांचे भाग्येशला मार्गदर्शन लाभले. शिक्षक असलेले मामा प्रवीण शिंदे, गणेश शिंदे यांनी भाग्येशला वेळोवेळी प्रोत्साहन व पाठबळ दिले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळवल्यानंतर भाग्येश जाधव यांचे शहरात सर्व स्तरांतून अभिनंदन व कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

SCROLL FOR NEXT