Suspect who posted photo with sword on Nashik social media. including the anti-gang squad of the city crime branch esakal
नाशिक

Nashik Crime: सोशल मीडियावरील ‘भाई’ला ठोकल्या बेड्या! गुन्हेशाखेच्या गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

सोशल मीडियावर रिल्स बनविण्याचे फॅड सध्या तरुणांमध्ये चांगलेच पसरले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सोशल मीडियावर रिल्स बनविण्याचे फॅड सध्या तरुणांमध्ये चांगलेच पसरले आहे. परंतु असे रिल्स करताना अनेकांना भाईगिरीचाही नाद लागला आहे.

अशाच एका १९ वर्षीय ‘भाई’ने तलवार हातात घेतलेला फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असता, त्याच गुंडाविरोधी पथकाने अटक केली आहे. (Bhai on social media arrested Performance of Crime Branch Anti goon Squad Nashik Crime)

दीपक रंगीलाल यादव (१९, रा. सनराईज रोलिंग शेटर, अंबड-सातपूर लिंक रोड, अंबड. मूळ रा. रामनगर बेईली, बस्ती, उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

दीपक याने इन्स्ट्राग्राम या सोशल मीडियाच्या साईटवरील स्वत:च्या अकाऊंटवरून हातात तलवार घेतलेला फोटो पोस्ट केला होता. यातून त्याने दहशत निर्माण करण्याचा त्याचा प्रयत्न होता.

सदरची बाब शहर गुन्हेशाखेच्या गुंडाविरोधी पथकाचे प्रदीप ठाकरे यांना समजली. त्यानुसार पथकाने सोमवारी (ता.८) दुपारी अटक केली. त्याच्याकडून एक लोखंडी तलवार व गुप्ती जप्त करण्यात आली आहे.

याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार मलंग गुंजाळ, प्रदीप ठाकरे, मिलिन जगताप, गणेश भागवत, गणेश नागरे यांनी बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Maharashtra Assembly Election Result : जोगेश्वरी मध्ये लोकसभेनंतर विधानसभेतही फेर मतमोजणीची मागणी, हायकोर्टात याचिका दाखल करणार

SCROLL FOR NEXT