Rathotsav of Sri Kshetrapal Bhairavanath Maharaj and participating citizens on the occasion of Yatra on Tuesday. esakal
नाशिक

Bhairavanath Maharaj Yatraotsav : बोल भैरोबा की जय..! चांदोरीस रथोत्सव, हजारांवर भाविकांची उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा

Bhairavanath Maharaj Yatraotsav : 'बोल भैरोबा की जय'चा गजर व गुलाल खोबऱ्याची मुक्त उधळण करीत चांदोरी (ता. निफाड) येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचा यात्रोत्सव मंगळवारी (ता.१८) उत्साहात पार पडला.

यात्रोत्सवास भाविकांनी मोठी गर्दी केली होती. (Bhairavanath Maharaj Yatraotsav Chandori Rathotsav attendance of thousands of devotees nashik news)

यात्रेचा आज मुख्य दिवस असल्यामुळे पहाटे पाचला भैरवनाथ महाराजांना अभिषेक घालण्यात आला. महापूजा करून मंदिर देवदर्शनासाठी खुले करण्यात आले होते. पहाटेपासूनच भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली होती. नवस फेडणाऱ्या भाविकांनी परंपरेप्रमाणे गूळ, नारळ वाटून तर काही भक्तांनी मिरवणूक काढत दंडवत व लोटांगण घालून नवस फेडले.

यात्रेनिमित्त मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. सायंकाळी पाचच्या सुमारास रथोत्सवास सुरवात झाली. रथाचे मानकरी विलास नामदेव गडाख यांनी एक लाख ५ हजार रुपयांची बोली लावत पहिला लिलाव घेतला. राजेंद्र जमधडे यांनी ३१०० रुपयांचा दुसरा लिलाव घेतला. त्यावेळी भाविकांनी ‘बोल भैरोबा की जय’चा गजर केला.

संध्याकाळी निघालेल्या रथोत्सवात ‘मविप्र’चे सरचिटणीस नितीन ठाकरे, संचालक अशोक पिंगळे, शिवाजी गडाख, निशिकांत मोगल यांनी भेट देत दर्शन घेतले. यात्रोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सरपंच व ग्रामपालिका चांदोरी, भैरवनाथ महाराज पंच कमिटी यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक पी. वाय. कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल किरण ढेकळे, शेवाळे आणि शिंदे यांनी बंदोबस्त ठेवला होता.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

ग्रामपालिकेचे नेटके नियोजन

चांदोरी ग्रामपालिकेतर्फे यात्रेकरूंसाठी पाणी व दिवाबत्तीची सोय केली होती. चांदोरी गावांतर्गत रस्त्यावर मुरूम टाकत खड्डे बुजविल्याने भाविकांची गैरसोय टळली. गर्दी टाळण्यासाठी यात्रा परिसरात वाहनांना बंदी होती. सायखेडा पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवल्याने भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता आले.

कावड बक्षीसे

प्रथम : स्वराज सुजित भोज, द्वितीय : स्वप्नील कोरडे, तृतीय : वेदांत कोटमे. उत्तेजनार्थ : राजेंद्र पवार, यश गायखे, रुद्र लोंढे

यांचा झाला सत्कार

शिवाजी पा. गडाख, विनायक खरात, सौ मोनिका टर्ले, रघुनाथ टर्ले, अनिल भोर, कु. कल्याणी आहेर, कु. कांचन टर्ले, हृषिकेश सावंत, कु. विद्या खेलुकर, आकाश कोटमे, भूषण गडाख, पी. वाय. कादरी (सहायक पोलिस निरीक्षक), विशाल मोरे (अभियंता).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : भाजप नवाब मलिक यांचा प्रचार करणार नाही

SCROLL FOR NEXT