विकास गिते
सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर तालुक्यातील व शहरातील प्रसिद्ध श्री ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या भव्य यात्रा येत्या बुधवार ५ एप्रिल रोजी साजरी होत असून यात्रेची पूर्ण तयारी झाली आहेत. या यात्रेत लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक भाविक सहभागी होत असतात.
नोकरीनिमित्त बाहेर गेलेले व माहेरवाशीण यादिवशी यात्रेसाठी हमखास येत असतात. त्यामुळे या यात्रेचे विशेष व आनंद सर्वदूर असतो. श्री भैरवनाथ महाराजांच्या यात्रे निमित्त संपूर्ण मंदिराला रंगरंगोटी व विद्युत रोषणाईने सजवले असून सागवानी लाकडापासून बनवलेल्या रथाची संपूर्ण रंगरंगोटी करण्यात आलेली आहेत (Bhairavnath Maharaj Yatra Sinnar people ready for village deity Bhairavnath Maharaj Yatra nashik news)
सिन्नर मधील विडी कामगार यांच्या निधीतून हा रथ तयार केला आहे. या रथातून श्री भैरवनाथ महाराजांच्या मुकुटाची संपूर्ण शहरातून मिरवणूक काढण्यात येते स्वर्गीय ह. भ. प. श्री त्र्यंबक बाबा भगत यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी यात्रा उत्साहात साजरी करण्यात येते.
यावर्षी ह.भ.प. पारायण त्र्यंबक बाबाभगत यांची उणीव सर्व सिन्नरकर यांना भासणार असून संपूर्ण सिन्नर तालुक्यातील महाराष्ट्र वैभवाचे स्थान या मंदिरांने निर्माण केले आहेत . सिन्नर मधील भजनी मंडळी रथाच्या मागे भजन गात असतात.
यात्रेला व रथासाठी संपूर्ण सिन्नर शहरात सिन्नर नगरपालिका व सिन्नर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त मानाने प्रत्येक रस्त्यावर व चौकात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. त्यामुळे प्रत्येक हालचालीवर प्रशासन नजर ठेवून आहेत.
ही यात्रा दिवाळी सणा सारखीच संपूर्ण शहराला असून यात्रेनिमित्त प्रत्येक घरासमोर व रस्त्यावर सुरेखशी रांगोळी काढण्यात येते. महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य प्रत्येक घरातून दिला जातो. रथाच्या मागे शेकडो कावडी धारक पहाटेच्या चार वाजेपासून तर सायंकाळपर्यंत अनवाणी पायांनी चालत असतात.
अनेक नागरिक व कुटुंब तसेच सामाजिक संस्था कावडी धारकांना प्रसाद व महिला कावडी धारकांचे पाय धुण पूजा करतात. तसेच प्रत्येक सिन्नरकर या यात्रेमध्ये सहभागी होऊन श्री भैरवनाथ यात्रेत उत्साहात भाग घेतात.
यामध्ये अनेक भाविक व भक्तजन भाग घेऊन अनेक सामाजिक संदेश व विविध प्रकारच्या कावडीद्वारे प्रबोधन सामाजिक संदेश सिन्नर भर देत असतात गंगेचे पाणी आणून देवाला अभिषेक केला जातो. तसेच रथ ओढण्यासाठी शेकडो बैलजोड्या शहरात येतात हा रथ सागवनी लाकडापासून बनवले आहेत.
हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?
सिन्नर मधील विडी कामगारांकडून दिलेल्या निधीतून रथ तयार केला आहे. त्याला एकशे दोन वर्ष पूर्ण झालेली असून हा रथ ओढण्यासाठी बैलजोड्या सज्ज करण्यात आलेले आहेत. नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय केदार व सिन्नर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने बंदोबस्त ठेवलेले.
आहेत अभिषेक व पूजन होणार असून यात्रेस प्रारंभ व सुरुवात होईल. बुधवारी पहाटे पासून रथाला सुरुवात ऊन सायंकाळपर्यंत श्री भैरवनाथ मंदिरातील गुरुवारी सायंकाळी बारादरी येथील शेतात कुस्त्यांचा फड रंगणार आहे. अनेक पैलवानांची इथे हजेरी व कुस्ती बघण्यास मिळणार आहे. तसेच विजेते पैलवानांना रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.
यात्रा उत्सव समितीचे शांततेने यात्रा उत्सव पार पाडावा असे आवाहन संयोजक मधुकर भगत सर, विलास महाराज भगत, कृष्णाजी भगत, चिंतामण भगत, मनोज भगत सुनिल भगत व संपूर्ण भगत परिवार व नाशिक वेस मित्र मंडळाने केले आहे.
तसेच नाशिक वेस, गंगावेस भैरवनाथ मंदिर, सरस्वती पुल, खासदार पुल भाजीविक्रेते रस्त्यावर बसणारे आणि फेरीवाली हातगाडीवाले आदींना सिन्नर नगरपालिका व पोलीस प्रशासनाने दुकाने न थाटण्याची आव्हान करणारअसून रथाचा जो काही मार्ग असेल तेथे भरणारा भाजीबाजार बंद ठेवण्यात आलेला असून या सूचनेचे पालन सर्वांना करण्यास सांगितले आहे. यात्रेचा लाभ जास्तीत जास्त भाविकांनी घ्यावा असे आव्हान भगत परिवार तसेच पाचोरे परिवार व सर्व सिन्नर करा तर्फे करण्यात आलेले आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.