Cyclist with police officer Ravindra Singhal while welcoming Mohinder Singh Bharaj who completed his cycle ride from Kathmandu to Mumbai. esakal
नाशिक

Inspirational: काठमांडू मुंबई सायकलवारी पूर्ण; नाशिकच्या भराजांचा 68 व्या वर्षी डब्‍ल्‍यूयूसीए वर्ल्ड रेकॉर्ड

सकाळ वृत्तसेवा

Nashik News: येथील मोहिंदरसिंग भराज यांनी काठमांडू (नेपाळ) ते मुंबईतील गेट वे ऑफ इंडियादरम्‍यानचे अंतर सायकलवर यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे.

६८ वर्षीय श्री. भराज यांनी दोन हजार १९० किलोमीटरची ही सायकलवारी पूर्ण करताना अमेरिकेचे ‘डब्ल्‍यूयूसीए वर्ल्ड रेकॉर्ड’ केले आहे. दररोज साडेतीनशे ते चारशे किलोमीटर अंतर ते कापत होते, हे विशेष. (Bharaj successfully completed distance from Kathmandu to Gateway of India in Mumbai on bicycle nashik news)

नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य मोहिंदरसिंग भराज यांनी काठमांडू ते मुंबईदरम्‍यानचे अंतर केवळ सात दिवस, सात तास, ४० मिनिटे इतक्‍या वेळेत पूर्ण केले. सोमवारी (ता. १३) दुपारी अडीचला ते मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे पोचले. त्यांचा हा सायकल प्रवास काठमांडू (नेपाळ) येथून सुरू करताना बिहार, अयोध्या, लखनौ, कानपूर, झाशी, शिवपुरी, इंदूर, धुळे, नाशिकमार्गे मुंबईत गेट वे ऑफ इंडियापर्यंत राहिला.

या मोहिमेतून त्यांनी देशवासीयांना ‘पर्स्पायर टू इन्स्पायर’, असा संदेश दिला. ६८ व्या वर्षी सायकलिंग करून आरोग्‍य सुदृढ राखू शकतो, तर प्रत्‍येकानेही आपले आरोग्‍य चांगले ठेवण्याची प्रेरणा घ्यावी, अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

या मोहिमेदरम्‍यान श्री. भराज यांना नाशिक सायकलिस्टस फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर काळे, दिनकर पाटील, डॉ. महेंद्र महाजन, डॉ. मुस्तफा टोपीवाला, नितीन वानखेडे, सुखदीपसिंग भराज, रवींद्रसिंग ओबेरॉय यांची साथ लाभली. सोमवारी गेट वे ऑफ इंडिया येथे वरिष्ठ पोलिस अधिकारी रवींद्र सिंघल यांच्‍यासह सायकलिस्‍टने मोहिंदरसिंग भराज यांचे जल्‍लोषात स्वागत केले.

वातावरणातील बदलांचा सामना

६८ वर्षीय श्री. भराज यांना रस्‍ते सुरक्षाविषयक आव्‍हान तर होते, याशिवाय वातावरणातील बदलांचेही आव्‍हान होते. नेपाळमध्ये रात्रीची थंडी आणि भारतामधील दुपारचे ऊन आणि वाहतूक अशा आव्‍हानांचा सामना करताना त्‍यांनी सायकलवर ही रॅली पूर्ण केली. श्री. भराज यांचा ६ नोव्‍हेंबरला वाढदिवस होता. ते मोहिमेदरम्यान बिहारमध्ये असल्याने त्‍यांनी तेथेच आपला वाढदिवस साजरा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT