Bharat Jodo Nyaya Yatra : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सिडको मध्ये काँग्रेसची बैठक झाली. सिडकोमधील पक्षिय संघटन तसेच बूथनिहाय नियोजन करून आगामी लोकसभा, विधानसभा, महापलिका निवडणुका कशा पद्धतीने लढायच्या यावर चर्चा करण्यात आली.
भारत जोडो न्याय यात्रा शहरातून जाणार असून त्या संदर्भात नियोजन करण्यात आले. (Bharat Jodo Nyay Yatra will go through cidco nashik news)
यात्रेचे स्वागत सिडको परिसरात यात्रेचे स्वागत करण्यात येणार असून, कामगार संघटना, फेरीवाला संघटना, महिला बचतगट हेदेखील राहुल गांधी यांची भेट घेऊन चर्चा करतील, असा प्रस्ताव करण्यात आला.
आपल्या भाषणात शोभा बच्छाव यांनी कामगार, महिला यांचे प्रश्न समजून सिडको परिसरात काम करावे आणि जनतेला बीजेपी सरकारच्या खोट्या आणि फसव्या योजना बाबत जागृत करावे असे आवाहन केले.
प्रदेश प्रवक्ता हेमलता पाटील, प्रभारी राजेंद्र बागूल यांनी मार्गदर्शन केले. शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी यात्रा सिडकोत येत असताना सर्व सामन्य जनतेचा सहभाग कसा होईल, यासाठी प्रयत्न करावे अशी सूचना केली.
बैठकीत अनु. जमाती काँग्रेस शहराध्यक्ष संतोष ठाकूर, जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष वंदना पाटील, महिला शहराध्यक्ष स्वाती जाधव, सेवादल अध्यक्ष वसंत ठाकूर, ओबीसी अध्यक्ष गौरव सोनार, भालचंद्र पाटील, युवक काँग्रेस अध्यक्ष स्वप्नील पाटील, जयेश पोकळे, मीरा साबळे, प्रमिला पाटील, चारुशीला काळे, देवेंद्र देशपांडे, रमेश बागुले, भालचंद्र पाटील, देवराम सैदाणे, गौरव सोनार, अशोक लहामगे.
भाऊसाहेब भदाणे, नंदकुमार सूर्यवंशी, नाना भामरे, सुरेश जाधव, धोंडिराम आव्हाड, किशोर ठाकूर, सूरज चव्हाण, अनिकेत खातले, सुभाष पाटील, नानासाहेब देवरे, विसपुते, नीतेश निकम, जाधव, जयदीप चौधरी, अजिंक्य देवरे, अमृत सोनवणे, शिवम अलई, प्रज्ञानंद मगडे, इम्रान अन्सारी, अजय ठाकूर, भास्करराव मैंद, कैलास काळे.
उमेश डुंबरे, समीर शेख, बाळासाहेब लोंढे पाटील, चेतन फेगडे, अनुज सिंग, चंद्रकांत फेगडे, महेश देवरे, सुनील राजपूत, प्रकाश माळी, रोहिणी वाघ, कविता बोंद्रे, विद्या सोनार, बेबी भामरे, माया पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन ब्लॉक अध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष भरत पाटील यांनी केले. आभार वंदना पाटील यांनी मानले.
विधानसभेचा उमेदवार कोण ?
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसला सोडण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसच्या बैठकीत करण्यात आली. त्यामुळे या मतदारसंघातील नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना आशेचा अंकुर फुटला आहे. याकरिता आता चाचपणी सुरू झाली असून काँग्रेसच्या जिल्हा महिलाध्यक्ष वंदना पाटील, माजी ज्येष्ठ नगरसेवक लक्ष्मण जायभावे, अण्णा पाटील, विजय पाटील आदींच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.