चांदोरी : ‘सोनियाच्या राती उजळल्या मोती... ओवाळीते भाऊराया... वेड्या बहिणीची वेडी ही माया...’ हे गीत भाऊबीजेच्या दिवशी कुठल्याही बहिणीच्या कानावर पडले, तर तिच्या मनात भावाची आठवण दाटून येते. (Bhaubij 2023 Police inspector sunil patil fulfil wish of soldier sister at chandori nashik)
सैनिक असलेला भाऊ हजारो कोस दूर, जंगलात, नक्षलवादी भागात अतिशय जोखमीच्या परिस्थितीत तैनात असतो. त्याच्या बहिणीच्या मनात अनेक उमाळे फोडणारा गहिवर दाटून येतो. अशाही स्थितीत भावाला देशासाठी समर्पित केल्याचा अभिमान बाळगत या बहिणी आपल्या वेड्या मनाची समजूत घालतात.
दारणा सांगवी डोंगर गाव येथील सागर रोहम तीन वर्षांपासून सैन्यात आहेत. आजवर जम्मू-काश्मीर, कोलकाता, दिल्ली आदी ठिकाणी त्यांची पोस्टिंग झाली. सध्या ते उत्तर प्रदेशमधील झांशी येथे असून, सैनात गेल्यापासून एकही रक्षाबंधन व भाऊबीज त्यांनी आपल्या बहिणीसोबत साजरे केले नाही.
टीव्हीवर बहीण-भावांचे कार्यक्रम दाखविले जातात, तेव्हा प्रत्येक वेळी कुटुंबियांना सागरची आठवण येते. रक्षाबंधन, भाऊबीजेला सकाळपासूनच भावाच्या आठवणींनी डोळे भरून येतात.
बुधवारी (ता. १५) भाऊबीजनिमित्त सायखेड्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी निफाड तालुक्यातील अन् सायखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शेवटचे गाव असलेल्या दारणा सांगवी डोंगरवाडी गावी जात सागरची उणीव दूर करत माधुरीच्या भावाची जबाबदारी पार पाडली.
हा क्षण डोळ्यात आनंदाश्रू देऊन गेला. सायखेडा पोलिसांची निभावलेले भावाचे कर्तव्य कुटुंबातील सदस्यांना आनंद देऊन गेला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.